मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Burger Price Hike : तरुणाईचं आवडतं बर्गर महागलं; कंपनीकडून तिसऱ्यांदा दरवाढीची घोषणा

Burger Price Hike : तरुणाईचं आवडतं बर्गर महागलं; कंपनीकडून तिसऱ्यांदा दरवाढीची घोषणा

Jan 07, 2023, 08:50 AM IST

    • Burger Price Hike : काही महिन्यांपूर्वीच मॅकडोनाल्ड कंपनीनं बर्गरची किंमत दोनदा वाढवली होती. त्यानंतर आता नववर्षाचा पहिला आठवडा संपत असतानाच पुन्हा बर्गरची किंमत वाढवण्यात आली आहे.
Burger Price Hike (HT)

Burger Price Hike : काही महिन्यांपूर्वीच मॅकडोनाल्ड कंपनीनं बर्गरची किंमत दोनदा वाढवली होती. त्यानंतर आता नववर्षाचा पहिला आठवडा संपत असतानाच पुन्हा बर्गरची किंमत वाढवण्यात आली आहे.

    • Burger Price Hike : काही महिन्यांपूर्वीच मॅकडोनाल्ड कंपनीनं बर्गरची किंमत दोनदा वाढवली होती. त्यानंतर आता नववर्षाचा पहिला आठवडा संपत असतानाच पुन्हा बर्गरची किंमत वाढवण्यात आली आहे.

Burger Price Hike : भारतासह अमेरिका आणि युरोपमध्ये महागाईचं सावट असतानाच आता तरुणाईचं आवडतं खाद्यपदार्थ असलेल्या बर्गरची किंमत वाढवण्याचा निर्णय मॅकडोनाल्ड कंपनीनं घेतला आहे. त्यामुळं आता चविष्ट बर्गरचं सेवन करणं हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. याशिवाय ज्या लोकांना सातत्यानं बर्गर खायची सवय आहे, त्यांना त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळं आता गॅस, खाद्यतेल आणि इंधनाच्या किंमती वाढल्यानंतर आता बर्गरच्याही किंमती वाढल्यानं ऐन हिवाळ्यात सामान्यांना महागाईच्या झळा बसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

दोन मित्र सोबत पीत होते दारू.. पत्नीविषयी अश्लील बोलल्याने झाला वाद अन् घरी येऊन जीवन संपवले

Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

काही महिन्यांपूर्वीच मॅकडोनाल्ड कंपनीनं बर्गरची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा बर्गरच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. जपानमध्ये मॅकडोनाल्ड कंपनीनं किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळं भारतातही आगामी काळात बर्गरच्या किंमती गगणाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यूज एजेन्सी रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, मॅकडोनाल्ड्सची उपकंपनी असलेल्या जपान लिमिटेडनं गेल्या दहा महिन्यांच्या काळात तिसऱ्यांदा बर्गरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या १६ जानेवारीपासून मूळ किंमतीपेक्षा ८० टक्के जास्त किंमतीत बर्गरची विक्री केली जाणार आहे. बर्गर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, वाहतूक, वीजेची किंमत आणि वाढलेल्या करांमुळं कंपनीनं बर्गरची किंमत वाढवली आहे. त्यामुळं आता जपानमध्ये १४० येनला मिळणारा बर्गर तब्बल २२० येनला मिळणार आहे. याशिवाय जपानमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या बिग मॅक हॅमबर्गरची किंमत ४१० येनवरून ४५० येन इतकी करण्यात आली आहे. त्यामुळं आता मॅकडोनाल्ड्सनं जपानमध्ये बर्गरच्या किंमतीत वाढ केल्यामुळं त्याचे विपरित परिणाम भारतात विक्री होणाऱ्या बर्गरवरही होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विभाग