मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Doping Case : कुस्ती जिंकण्यासाठी होतोय इंजेक्शन्सचा वापर; तीन औषधविक्रेत्यांचे लायसन्स रद्द

Doping Case : कुस्ती जिंकण्यासाठी होतोय इंजेक्शन्सचा वापर; तीन औषधविक्रेत्यांचे लायसन्स रद्द

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 07, 2023 07:42 AM IST

Doping Case In Malshiras : कुस्तीच्या मैदानात उतरण्याआधी पैलवान घातक इंजेक्शन घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Doping Case In Malshiras Solapur
Doping Case In Malshiras Solapur (HT)

Doping Case In Malshiras Solapur : कुस्तीचं मैदान मारण्यासाठी पैलवान इंजेक्शनचा वापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं सोलापुरात खळबळ उडाली असून त्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासनानं शहरात छापेमारी करत तीन औषधविक्रेत्यांच्या मेडिकलचे लायसन्स रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय मेफेन टरमाईन हे इंजेक्शन विकल्याचा आरोप औषधविक्रेत्यांवर आहे. त्यामुळं आता कुस्तीतील डोपिंगची कीड महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या खेळाला संपवणार की काय?, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये काही औषधविक्रेते मेफेन टरमाईन हे इंजेक्शन डॉक्टरांच्या परवानगीशिवाय पैलवानांना विकत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. पैलवान शेकडो इंजेक्शन्स खरेदी करून तालिमीत नेत होते. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं माळशिरसमध्ये मेडिकल्सची तपासणी करायला सुरुवात केली. त्यानंतर संशयित औषधविक्रेत्यांकडून खुलासा मागवण्यात आला. परंतु असमाधानकारक उत्तर मिळाल्यानं प्रशासनानं या मेडिकल्सवर कारवाई करत त्यांचा परवाना रद्दबातल केला आहे. त्यामुळं आता ही कारवाई फक्त सोलापूर जिल्ह्यात झालेली असली त्याचं रॅकेट संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पैलवानांना या इंजेक्शनचा फायदा काय?

कुस्ती खेळताना शरीरातील रक्तदाब वाढवण्यासाठी पैलवान मेफेन टरमाईन हे इंजेक्शन घेत आहेत. रक्तदाब वाढल्यानं कु्स्तीसाठी दम वाढून शरीर दणकट होते. याशिवाय इंजेक्शनमुळं अतिरिक्त ताकद आल्यामुळं मनातील भीतीही कमी होते. त्यामुळं राज्यातील अनेक ठिकाणी पैलवान अशा प्रकारे घातक इंजेक्शन्सचा वापर करत असल्याच्या घटना यापूर्वीही समोर आलेल्या आहेत. त्यामुळं आता या घटनेनंतर प्रशासन आरोपींवर कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point