मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yogesh Kadam Accident : योगेश कदमांच्या अपघातानंतर ड्रायव्हर फरार; कार्यकर्त्यांना घातपाताचा संशय

Yogesh Kadam Accident : योगेश कदमांच्या अपघातानंतर ड्रायव्हर फरार; कार्यकर्त्यांना घातपाताचा संशय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 07, 2023 08:20 AM IST

Yogesh Kadam Car Accident : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्याही कारला अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Yogesh Kadam Car Accident In Ratnagiri Live Updates
Yogesh Kadam Car Accident In Ratnagiri Live Updates (HT)

Yogesh Kadam Car Accident In Ratnagiri Live Updates : शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेनं जात असताना कशेडी घाटात अवजड वाहनानं कारला मागून जोराची धडक दिल्यामुळं हा अपघात झाला आहे. आमदार योगेश कदम हे सुखरुप बचावले आहेत. योगेश कदम यांचे दोन सहकारी आणि काही पोलिसांना किरकोळ मार लागल्यानं त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. परंतु हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय योगेश कदमांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा योगेश कदम यांच्या कारला अपघात झाल्यानंतर त्यांच्या ड्रायव्हरनं घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती आहे. त्यामुळं अपघात झाल्यानंतर योगेश कदमांच्या ड्रायव्हरनं घटनास्थळावरून पळ का काढला?, त्यानं इतरांना वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही?, अपघात घडवून फरार होण्याचा योगेश कदमांच्या ड्रायव्हरचा प्लॅन होता का?, असे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळं आता शिंदे गटाच्या नेत्यांसह योगेश कदमांच्या कार्यकर्त्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्याही वाहनाला अपघात झाला होता. त्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदाराच्या वाहनाला अपघात झाल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पुढील कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होतील- योगेश कदम

कशेडी घाटात झालेल्या अपघातानंतर योगेश कदम यांनी एक व्हिडिओ शेयर करत मी सुखरुप असून कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, असं म्हटलं आहे. आई जगदंबेच्या कृपेनं आम्ही सर्व सुखरुप असून माझे पुढील कार्यक्रम ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचंही योगेश कदमांनी स्पष्ट केलं आहे.

WhatsApp channel