मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Lalu prasad yadav : नरेंद्र मोदी सरकार जाण्याची वेळ आलीय; २०२४ मध्ये होणार मोठा विक्रम - लालू यादव

Lalu prasad yadav : नरेंद्र मोदी सरकार जाण्याची वेळ आलीय; २०२४ मध्ये होणार मोठा विक्रम - लालू यादव

Feb 25, 2023, 08:07 PM IST

  • Lalu prasad yadav on Bjp Government : लालू यादव म्हणाले की, आम्हाला देश वाचवायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सक्षण करायचे आहे. आता नरेंद्र मोदी सरकार जाण्याची वेळ आली आहे.

Lalu prasad yadav

Lalu prasad yadav on Bjp Government : लालू यादव म्हणाले की, आम्हाला देश वाचवायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सक्षण करायचे आहे. आता नरेंद्र मोदी सरकार जाण्याची वेळ आली आहे.

  • Lalu prasad yadav on Bjp Government : लालू यादव म्हणाले की, आम्हाला देश वाचवायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सक्षण करायचे आहे. आता नरेंद्र मोदी सरकार जाण्याची वेळ आली आहे.

बिहारमधील पूर्णिया येथे शनिवारी महाआघाडीचा महामोर्चा पार पडला. या महाआघाडीतील सातही पक्ष सहभागी झाले होते. आरजेडी, जेडीयू, काँग्रेससह अन्य पक्षांनी भाजपवर तोंडसुख घेतले.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव हेही ऑनलाइन माध्यमातून या रॅलीत उपस्थित होतेआणित्यांनीभाजपवर जोरदार निशाणा साधला.आपण आणि नितीश कुमार एक झालो आहोत त्यामुळे भ्रमात कोणीही राहू नये. भविष्यातही आमची एकजूट कायम राहील. आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, आम्हाला बिहारला पुढे न्यायचे आहे आणि आम्ही भाजपचा सपुडासाफ करण्यास सज्ज आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

लालू यादव म्हणाले की, आम्हाला देश वाचवायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सक्षण करायचे आहे.बिहार आणि देशाला पुढे न्यायचे असून देशातीलअल्पसंख्याकांची सुरक्षा करायची आहे. आता नरेंद्र मोदी सरकार जाण्याची वेळ आली आहे.

२०१५ पेक्षा मोठा विक्रम २०२४ मध्ये होणार -
लालू यादव यांनी रॅलीत आलेल्या लोकांना आठवण करून दिली की २०१५ मध्ये दाखवलेल्या मताच्या ताकदीपेक्षा २०२४ मध्ये मोठा रेकॉर्डकरायचा आहे. २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने विजयाची हॅट्ट्रिक करत १७८ जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएच्या खात्यात५८जागा गेल्या होत्या. ज्यामध्ये आरजेडीला ८०, जेडीयूला ७१ आणि काँग्रेसला २७ जागा मिळाल्या. तर भाजपच्या खात्यात ५३ जागा आल्या. अशाच प्रकारच्या विजयासाठी लालूंनी पुन्हा एकदा बिहारच्या जनतेला आवाहन केले आहे.

 

मुलगी रोहिणींना आठवून लालू यादव भावूक झाले, लालू म्हणाले की, मी पूर्णियात नसल्याचं दु:ख आहे. नुकतेच माझे किडनी प्रत्यारोपण झाले आहे. मुलगी रोहिणी हिने किडनी दिली. तिने एवढा मोठा त्याग केला आहे,त्या मुलीचे मी आभार मानतो.लालू म्हणाले की, महाआघाडी एक आहे आणि भाजपला पराभूत करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. लालू प्रसाद यादव नुकतेच सिंगापूरमधून किडनी प्रत्यारोपण करून मायदेशी परतले आहेत. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी त्यांची किडनी त्यांना दान केली.