मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Korean Air : लॅंडिंग करताना विमान रनवेवरून घसरलं, १६२ प्रवासी बालंबाल बचावले; घटनेनंतर विमानतळ बंद

Korean Air : लॅंडिंग करताना विमान रनवेवरून घसरलं, १६२ प्रवासी बालंबाल बचावले; घटनेनंतर विमानतळ बंद

Oct 24, 2022, 04:02 PM IST

    • plane crash today philippines 2022 : कोरियन एअर कंपनीचं विमान फिलिपिन्सच्या एका विमानतळावर लॅंडिंग करत असताना हा अपघात झाला आहे.
plane crash today philippines 2022 (HT)

plane crash today philippines 2022 : कोरियन एअर कंपनीचं विमान फिलिपिन्सच्या एका विमानतळावर लॅंडिंग करत असताना हा अपघात झाला आहे.

    • plane crash today philippines 2022 : कोरियन एअर कंपनीचं विमान फिलिपिन्सच्या एका विमानतळावर लॅंडिंग करत असताना हा अपघात झाला आहे.

plane crash today philippines 2022 : तब्बल १६२ प्रवाशांनी भरलेलं विमान फिलिपिन्समधील विमानतळावर लॅंडिंग करत असताना अचानक घसरल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. कोरियन एअर कंपनीच्या या विमानाला अपघात झाला असून सुदैवानं यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. लॅंडिंग करताना विमानाची चाकं धावपट्टीवरून घसरू लागल्यानं प्रवाशांसह विमानातील कर्मचाऱ्यांना बाहेर येण्यासाठी आपातकालीन दरवाजांचा वापर करावा लागला. विमानातून उतरल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यानंतर फिलिपिन्सच्या सरकारनं मॅक्टन विमानतळ पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

झारखंडमध्ये सूर्य देवाचा प्रकोप! तापमान पोहोचले ४७ अंश सेल्सिअसवर, २ बेशुद्ध, एकाचा मृत्यू, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर; रामलल्ला दर्शन, शरयू पूजन, असा आहे संपूर्ण कार्यक्रम!

Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, तीन महिलांसह १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Monsoon Update : खुशखबर! यंदा मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, बरसणारही जोरदार ; ‘या’ दिवशी केरळात धडकणार

मिळालेल्या माहितीनुसार, कोरियन एअर कंपनीचं एअरबस ए३३० हे विमान कोरियाच्या इंचिओन विमानतळावरून फिलिपिन्सच्या मॅक्टनसाठी निघालं होतं. हे विमान मॅक्टन विमानतळावर उतरत असताना अचानक धावपट्टीवर घसरलं. त्यावेळी विमानात १६२ प्रवासी बसलेले होते. परंतु मॅक्टन विमानतळावरील रेस्क्यू पथकानं तातडीनं मदत व बचावकार्य सुरू केल्यानं सर्व प्रवाशांचे जीव वाचवण्यात यश आलं आहे. त्यानंतर कोरियन एअर कंपनीच्या अध्यक्ष व्हू किहोंग यांनी सर्व प्रवाशांनी माफी मागितली असून भविष्यात अशा घटना आम्ही टाळण्याचा प्रयत्न करू, असं म्हटलं आहे.

अपघातग्रस्त विमानाला धावपट्टीवरून हटवण्याचं काम सुरू...

धावपट्टीवरून विमान घसरल्यानंतर मॅक्टन विमानतळ पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात आलं आहे. याशिवाय विमानतळ प्रशासनानं अपघातग्रस्त विमानाला धावपट्टीवरून हटवण्याचं काम हाती घेतलं असून लवकरात लवकर विमानतळ सुरू करण्यात येईल, असं विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.