मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indore Temple Accident: इंदूर दुर्घटनेतील मृतांची संख्या ३५ वर; १८ भाविक जखमी

Indore Temple Accident: इंदूर दुर्घटनेतील मृतांची संख्या ३५ वर; १८ भाविक जखमी

Mar 31, 2023, 09:55 AM IST

  • People fall in well in temple : इंदूर शहरातील बेलेश्वर मंदिरातील दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला आहे. तब्बल ३५ भाविक या दुर्घटनेत ठार झाले असून १८ जन जखमी झाले आहेत. जुन्बाया विहिरीचे छत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. त्यावर उभे असलेले तब्बल ४० हून ३० लोक विहिरीत पडले. त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

इंदूर शहरातील बेलेश्वर मंदिरातील दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला

People fall in well in temple : इंदूर शहरातील बेलेश्वर मंदिरातील दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला आहे. तब्बल ३५ भाविक या दुर्घटनेत ठार झाले असून १८ जन जखमी झाले आहेत. जुन्बाया विहिरीचे छत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. त्यावर उभे असलेले तब्बल ४० हून ३० लोक विहिरीत पडले. त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • People fall in well in temple : इंदूर शहरातील बेलेश्वर मंदिरातील दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला आहे. तब्बल ३५ भाविक या दुर्घटनेत ठार झाले असून १८ जन जखमी झाले आहेत. जुन्बाया विहिरीचे छत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. त्यावर उभे असलेले तब्बल ४० हून ३० लोक विहिरीत पडले. त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

People fall in well in temple : रामनवमीच्या दिवशी इंदूरच्या पटेल नगर येथील बेलेश्वर मंदिरात असलेल्या बावडी (विहिर) चे छत कोसळल्याने झालेल्या दुर्घटतेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या घटनेत ३५ भविकांचा मृत्यू झाला असून तब्बल १८ नागरिक जखमी झाले आहेत. आणखी काही भाविक बेपत्ता असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काल रामनवमी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक या मंदिरात आले होते. दरम्यान, या बावडीचे छत कोसळल्याने ही दुर्घटना झाली.

ट्रेंडिंग न्यूज

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

काल राम नवमी निमित्त इंदूरच्या पटेल नगर येथील बेलेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. यावेळी दर्शन घेत असतांना येथे असणाऱ्या विहीरीवरील छत कोसळल्याने मंदिरात असलेले अनेक भाविक या विहिरीत पडले. या घटनेत काल १३ भाविकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर १७ जणांना सुखरुप बाहेर काढले होते. ही विहिर तब्बल ६० फुटाहून अधिक खोल आहे. 

काल झालेल्या दुर्घटनेत ३० हून अधिक लोक या विहिरीत कोसळले होते. दरम्यान प्रशासनाकडून तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले. अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज मृत भविकांचा आकडा १३ हून ३५ वर पोहचला आहे. आणखी काही भाविक बेपत्ता असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

रामनवमीच्या निमित्त बेलेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या दरम्यान जुन्या विहिरीचे छत कोसळल्याने त्यामध्ये दोन डझनहून अधिक लोक विहिरीत पडले.एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, धार्मिक कार्यक्रम सुरू असताना मंदिरातील पुरातन विहिरीच्या छतावर लोकांची गर्दी जमा झाली होता. लोकांचे ओझे न पेलल्याने छत विहिरीत कोसळले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना या प्रकरणाची माहिती घेत भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे निर्देश दिले आहेत.

जखमींमध्ये समावेश असलेल्या मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले की, ही घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. शेवटच्या प्रसादासोबतच आरतीची तयारीही सुरु होती. यादरम्यान अचानक सगळे खाली पडले. मला पोहता येतं, म्हणून कसाबसा बाहेर आलो, असं त्यांनी सांगितलं.

लष्कराचे ७५ जवान बचावकार्य करत आहेत. विहिरीत ४० फूट खोलपर्यंत बचावकार्य करत आहेत. विहिरीतील पाणी गळतीमुळे मध्येच कारवाई थांबवून पाणी उपसावे लागत आहे. लष्कर, एसडीईआरएफ, एनडीईआरएफ, जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या पथकासह एकूण १४० जण बचाव कार्यात सहभागी आहेत.

विभाग