मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतीय हवाई दलात बाप-लेकीची पहिलीच जोडी, उडवलं फायटर जेट

भारतीय हवाई दलात बाप-लेकीची पहिलीच जोडी, उडवलं फायटर जेट

Jul 06, 2022, 03:31 PM IST

    • भारतीय हवाई दलाच्या इतिहासतली पहिलीच बाप लेकीची जोडी आहे. दोघांनीही एकाच इन फॉर्मेशनमधून उड्डाण केलं.
संजय शर्मा आणि अनन्या शर्मा (फोटो - एएनआय)

भारतीय हवाई दलाच्या इतिहासतली पहिलीच बाप लेकीची जोडी आहे. दोघांनीही एकाच इन फॉर्मेशनमधून उड्डाण केलं.

    • भारतीय हवाई दलाच्या इतिहासतली पहिलीच बाप लेकीची जोडी आहे. दोघांनीही एकाच इन फॉर्मेशनमधून उड्डाण केलं.

भारताच्या हवाई दलासाठी (Indian Air Force) अभिमानाची एक गोष्ट घडली आहे. हवाई दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाप लेकीच्या जोडीने एकत्रच फायटर जेट उडवलं. एअर कमांडर संजय शर्मा (sanjay Sharma) आणि त्यांची मुलगी फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा (Ananya Sharma) या दोघांनी फायटर जेट विमान उडवलं. लढाऊ विमान उडवणारी ही भारतीय हवाई दलाच्या इतिहासतली पहिलीच बाप लेकीची जोडी आहे. दोघांनीही एकाच इन फॉर्मेशनमधून उड्डाण केलं.

ट्रेंडिंग न्यूज

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जायेत खिल्ली, VIDEO

Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

Heat Wave Alert : मे महिन्यातही सूर्य कोपणार! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट

भारतीय हवाई दलात एअर कमोडोर असलेल्या संजय शर्मा यांची मुलगी फ्लाइंग surऑफिसर आहे. सध्या अनन्या शर्मा प्रशिक्षणार्थी आहे. त्यांनी हवाई दलाच्या बीदर स्टेशनवर हॉक १३२ एकाच इन फॉर्मेशनमधून उड्डाण केलं. फायटर पायलट अभ्यासक्रमात पदवी पूर्ण करण्याआधी अनन्या प्रशिक्षण घेत आहे. भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात हवाई दलात कधीच वडील आणि मुलीने एकत्र पायटर जेट उडवलं नव्हतं.

संजय शर्मा यांनी त्यांची मुलगी अनन्या शर्माचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, "माझ्याप्रमाणेच अनन्यालासुद्धा फायटर होण्याची इच्छा आहे. अनन्याची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. या गोष्टीचा मला अभिमान आहे." भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, एअर कमोडोर संजय शर्मा यांनी 30 मे रोजी फ्लाईंग ऑफिसर असलेली मुलगी अनन्या शर्मा हिच्यासह एकाच फॉर्मेशनमध्ये उड्डाण केलं. त्यांनी यासह भारतीय हवाई दलाच्या इतिहासात खास अशी नोंद केली. भारतीय हवाई दलात 2016 पासून महिलांना फायटर पायलट बनण्याची संधी देण्यात आली. सध्या हवाई दलातील अनेक महिला सुपरसॉनिक जेटही उडवतात.

विभाग