मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तालिबाननं शोधली मुल्ला उमरची २१ वर्षांपूर्वी जमिनीत गाडलेली कार; काय आहे रहस्य?

तालिबाननं शोधली मुल्ला उमरची २१ वर्षांपूर्वी जमिनीत गाडलेली कार; काय आहे रहस्य?

Jul 06, 2022, 03:14 PM IST

  • अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात (Afganistan) हल्ले झाले आणि त्यानंतर मुल्ला उमर (Mullah Omar) अमेरिकन सैन्यापासून वाचण्यासाठी लपून बसला होता. आता तब्बल २१ वर्षांनंतर तालिबानी दहशतवाद्यांनी झाबुल प्रांतातील एका ठिकाणाहून आपल्या कमांडरची शोधून गाडी काढली आहे.

मुल्ला उमरची हीच ती कार (हिंदुस्तान टाइम्स)

अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात (Afganistan) हल्ले झाले आणि त्यानंतर मुल्ला उमर (Mullah Omar) अमेरिकन सैन्यापासून वाचण्यासाठी लपून बसला होता. आता तब्बल २१ वर्षांनंतर तालिबानी दहशतवाद्यांनी झाबुल प्रांतातील एका ठिकाणाहून आपल्या कमांडरची शोधून गाडी काढली आहे.

  • अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात (Afganistan) हल्ले झाले आणि त्यानंतर मुल्ला उमर (Mullah Omar) अमेरिकन सैन्यापासून वाचण्यासाठी लपून बसला होता. आता तब्बल २१ वर्षांनंतर तालिबानी दहशतवाद्यांनी झाबुल प्रांतातील एका ठिकाणाहून आपल्या कमांडरची शोधून गाडी काढली आहे.

Mullah Omar Car: तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरची (Taliban Commander Mullah Omar) २१ वर्ष लपवून ठेवलेली कार तालिबान्यांनी (Taliban) खोदून बाहेर काढली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी मुल्ला उमर गायब झाला होता आणि अमेरिकेचे (America) हल्ले टाळण्यासाठी ही आपली आव़डती गाडी (Car) जमिनीत गाडली गेली होती. अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात हल्ले झाले आणि त्यानंतर मुल्ला उमर अमेरिकन सैन्यापासून वाचण्यासाठी लपून बसला होता. आता तब्बल २१ वर्षांनंतर तालिबानी दहशतवाद्यांनी झाबुल प्रांतातील एका ठिकाणाहून आपल्या कमांडरची शोधून गाडी काढली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या टोयोटा कारमध्ये मुल्ला उमर कंदहारहून जाबूलला आला होता आणि नंतर ही कार जमिनीत गाडून गायब झाला होता.

आता ही कार काढण्यात आली असून, दोन दशकांनंतरही ती पूर्णपणे सुरक्षित आहे. याचे कारण म्हणजे ती कार एका प्लास्टिकच्या आवरणात घालून पुरण्यात आली होती. गाडीच्या समोरच्या काचेचे नुकसान झाले आहे. आता ही कार अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. १९६० मध्ये कंदहारमध्ये जन्मलेल्या मुल्ला ओमरने तालिबानची स्थापना केली आणि १९८० च्या दशकात सोव्हिएत विरुद्ध युद्धाचे नेतृत्व केले. या लढाईत गोळी लागल्याने त्याला उजवा डोळा गमवावा लागला. तालिबानच्या निर्मितीमागे अमेरिकेचा हात असल्याचे म्हटले जाते.

मुल्ला उमरने स्वतःच डोळा काढला?

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जातो की मुल्ला उमरने स्वतःचा जखमी डोळा काढला होता, तर अनेकांचे म्हणणे आहे की त्याच्यावर शेजारच्या देशात उपचार झाले होते. अफगाणिस्तानातून सोव्हिएत सैन्य परतल्यानंतर मुल्ला उमरने कंदाहारमध्ये मौलवी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एक संघटना स्थापन केली, तिचे नाव होते तालिबान. तालिबानने १९९६ मध्ये अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली होती, पण २००१ मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर त्यांचे सर्व कमांडर मारले गेले.

मुल्ला उमर २०१३ मध्ये मारला गेला

गेल्या वर्षी अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली. तालिबानने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. मुल्ला उमरच्या आजारपणामुळे २०१३ मध्ये त्याचा मृत्यू झाला होता, मात्र तालिबानने जुलै २०१५ मध्ये ही माहिती दिली होती.

 

पुढील बातम्या