मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bhagwant mann: 'पंजाब हेच माझं कुटुंब' असं म्हणणारे भगवंत मान दुसरं लग्न करणार

Bhagwant mann: 'पंजाब हेच माझं कुटुंब' असं म्हणणारे भगवंत मान दुसरं लग्न करणार

Jul 06, 2022, 03:30 PM IST

    • Bhagwant mann Wedding: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर सहा वर्षांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसरं लग्न करणार आहेत. 
Bhagwant Mann - Gurpreet Kaur

Bhagwant mann Wedding: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर सहा वर्षांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसरं लग्न करणार आहेत.

    • Bhagwant mann Wedding: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर सहा वर्षांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसरं लग्न करणार आहेत. 

Punjab CM Bhagwant mann Wedding: आम आदमी पक्षाचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. भगवंत मान हे उद्या, ७ जुलै रोजी चंदीगड इथं डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी विवाहबद्ध होणार आहेत. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह होणार असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी उपस्थित राहणार असल्याचं समजतं.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

भगवंत मान यांचं हे दुसरं लग्न आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं असून ती आईसह अमेरिकेत वास्तव्यास आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवंत मान यांचा विवाह सोहळा थाटामाटात होणार नाही. या विवाहासाठी मान यांनी जवळच्या कुटुंबीयांना व मित्रांनाच आमंत्रण दिलं आहे. असं असलं तरी आम आदमी पक्षाचे सर्व मोठे नेते या सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे. या सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी आम आदमी पक्षाचे पंजाबचे प्रभारी राघव चड्डा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

भगवंत मान यांची आई व बहिणीनं त्यांच्यासाठी वधु शोधली आहे. गुरप्रीत कौर यांच्याशी मान कुटुंबीयांचा पूर्वीपासून परिचय आहे. गुरप्रीत कौर या शीख समाजातील असून एका सामान्य कुटुंबातील आहेत. शीख पद्धतीनंच हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

का झाला होता घटस्फोट?

स्टँडअप कॉमेडियन असलेल्या भगवंत मान यांनी २०१४ साली सक्रिय राजकारणात उडी घेतली होती. त्यानंतर ते याच क्षेत्रात रमले. पंजाब हेच माझं कुटुंब असल्याचं सांगत २०१५ साली त्यांनी पत्नी इंद्रप्रीत कौर यांना सोडण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक आयुष्य अत्यंत चांगलं चाललेलं असताना मान यांनी घेतलेल्या या निर्णयामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात आल्यानंतर त्यांना सहा महिने फेरविचार करण्याचा वेळ देण्यात आला होता. मात्र, भगवंत मान आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पंजाब हेच आपलं पहिलं कुटुंब अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

पुढील बातम्या