मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  HDFC ने वाढवले व्याज दर, कर्जाचे हफ्ते होणार महाग

HDFC ने वाढवले व्याज दर, कर्जाचे हफ्ते होणार महाग

Jun 07, 2022, 03:33 PM IST

    • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच एचडीएफसीसह काही बँकांनी एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे.
एचडीएफसी (फोटो - रॉयटर्स)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच एचडीएफसीसह काही बँकांनी एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे.

    • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच एचडीएफसीसह काही बँकांनी एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे.

भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसीने (HDFC) एमसीएलआर (MCLR) मध्ये वाढ केली आहे. सर्व प्रकराच्या कर्जावर ३५ बेसिस पॉइंटसची वाढ केल्याची घोषणा बँकेकडून करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याआधीच एचडीएफसीने एमसीएलआरमध्ये केलेल्या वाढीमुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. (hdfc bank hikes lending rate loan emi's to go up)

ट्रेंडिंग न्यूज

ऑस्ट्रेलियात नाईट आऊटदरम्यान महिला खासदाराला ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, पोस्ट करत मांडली व्यथा

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

Viral News : हनिमूनसाठी बँकॉकला गेली; पतीचे गुपित पुढे आल्याने हैराण झाली पत्नी, उचलले 'हे' पाऊल! वाचा

एचडीएफसी बँकेने त्यांच्या संकेतस्थळावर अपडेटेड व्याजदराची माहिती दिली आहे. यामध्ये एमसीएलआर एक महिन्यासाठी ७.५५ टक्के, तीन आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अनुक्रमे ७.६० आणि ७.७० टक्के इतका आहे. एक वर्षाचा एमसीएलआर ७.८५ टक्के झाला आहे. दोन वर्षासाठी हाच दर ७.९५ टक्के तर तीन वर्षांसाठी ८.०५ टक्के असणार आहे. ७ जूनपासून नवे व्याजदर लागू होणार आहेत.

एचडीएफसी बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे गृहकर्ज आणि इतर कर्जाच्या हफ्त्यात वाढ होणार आहे. एचडीएफसी बँकेशिवाय एसबीआय, बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा या बँकांनीसुद्धा एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे.

याआधी पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक आणि हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोरेशनने दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. रिझर्व्ह बँकेने तब्बल दोन वर्षानंतर रेपो रेटमध्ये बदल केला. कोरोना काळात आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवला होता. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये वाढ केली होती. ४ मे रोजी रेपो रेट ४० बेसिस पॉइंट म्हणजेच ०.४० टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बहुतांश बँकांनी दरात वाढ केली असून आता आगामी पतधोरण बैठकीत रेपो रेट आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एमसीएलआर म्हणजे काय?
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट हा कोणत्याही संस्थेचा अंतर्गत रेफरन्स रेट असतो. हा कोणत्याही कर्जावर किमान व्याज निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. एमसीएलआरला आरबीआयने भारतीय अर्थ व्यवस्थेत २०१६ मध्ये समाविष्ट केलं होतं. याआधी २०१० मध्ये लागू करण्यात आलेल्या बेस रेट सिस्टिमनुसार व्याज ठरवलं जात होतं. एमसीएलआर लागू झाल्यानंतर बेस रेट सिस्टिम बंद कऱण्यात आली.