मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PM Kisan Yojna बँकेच्या खात्यात यंदा पैसे जमा झाले नाहीत, घाबरून जाऊ नका

PM Kisan Yojna बँकेच्या खात्यात यंदा पैसे जमा झाले नाहीत, घाबरून जाऊ नका

Jun 07, 2022, 12:33 PM IST

    • पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ११ वी खेप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही खेप जमा झाली नसेल त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. हे सोपे पर्याय निवडा आणि पैसे बँकेच्या खात्यात जमा करुन घ्या 
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (हिंदुस्तान टाइम्स)

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ११ वी खेप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही खेप जमा झाली नसेल त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. हे सोपे पर्याय निवडा आणि पैसे बँकेच्या खात्यात जमा करुन घ्या

    • पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ११ वी खेप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही खेप जमा झाली नसेल त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. हे सोपे पर्याय निवडा आणि पैसे बँकेच्या खात्यात जमा करुन घ्या 

केंद्र सरकारने (Narendra Modi) पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संलग्न लोकांना २ हजार रुपयांची ११ वी खेप जारी केली आहे. ज्याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठ्या प्रमाणावर लाभ मिळतोय. खेप जारी केल्यानंतर अनेक शेतकरी असे आहेत ज्यांचे पैसे त्यांच्या खात्यात (Bank Account) आलेले नाहीत.जर तुम्ही या योजनेचा हिस्सा आहात आणि तुमच्या खात्यात तुमचे पैसे आले नाहीत चिंता करु नका.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

केंद्र सरकारने आता एक असं पाऊल उचललं आहे ज्यानं ही समस्या हातोहात मोकळी होईल. सरकारने यासाठी एक टोल फ्री नंबर जारी केला आहे. यामुळे तुम्ही घरबसल्या खेप फसण्याची किंवा येण्याची माहिती मिळवू शकता.या योजनेशी संलग्न शेतकऱ्यांसाठी सरकारने २१ हजार कोटी रुपये ३१ मे रोजी जारी केले आहेत. याचा फायदा जळपास १० कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.या योजनेची ही ११ वी खेप आहे. यापूर्वी १० खेपांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार रुपये पाठवले गेले आहेत.

दरवर्षी येतात इतके हजार रुपये

केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षी २ हजार रुपये दर चार महिन्यांनी एकदा पाठवले जातात. म्हणजेच शेतकऱ्यांना दरवर्षी केंद्र सरकार ६ हजार रुपये पाठवतं. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा होते. यापूर्वीची १०वी खेप केंद्राने १ जानेवारी २०२२ रोजी जारी केली होती.

अशी घ्याल माहिती

मोदी सरकारची पंत्रधान शेतकरी सन्मान योजनेची ११ व्या खेपेचे पैसे कित्येक कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले गेले आहेत. तरीही ज्यया शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत त्यांनी टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर फोन करुन मदतीसाठी विचारणा करावी.पीएम शेतकरी सन्मान योजनेशी संलग्न अनेक असे नंबर आहेत ज्यावरुन तुम्ही ही माहिती घेऊ शकता.

असा करा फोन

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा टोल फ्री नंबर आहे ०११-२४३००६०६ पीएम शेतकरी हेल्पलाइन नंबर १५५२६१ पंतप्रधान शेतकरी योजना इमेल आयडी pmkisan-ict@gov.in Live।

अशी घ्याल माहिती

पंतप्रधान शेतकरी वेबसाइटवर म्हणजेच https://pmkisan.gov.in/ वर जा.

‘लाभार्थी ची स्थिती’ या टॅबवर क्लिक करा.

इथे आधार संख्या किंवा खात्याची संख्येची माहिती द्या.

या नंतर ‘डेटा प्राप्त करा’ या टॅब वर क्लिक करा.

त्यानंतर इथं लाभार्थीने दिलेल्या माहितीद्वारे वर्तमान स्थितीची माहिती मिळेल

इथं ही खेप मिळवण्यासाठी तुमचं नाव लाभार्थीच्या यादीत असायला हवं.

 

पुढील बातम्या