मराठी बातम्या  /  क्रीडा  /  बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कोट्यवधींचा घोटाळा, भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांना अटक

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कोट्यवधींचा घोटाळा, भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांना अटक

Jun 07, 2022, 02:17 PM IST

    • विनय ओझा हे गेल्या ८ वर्षांपासून फरार होते. या प्रकरणातील बाकीच्या आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
naman ojha

विनय ओझा हे गेल्या ८ वर्षांपासून फरार होते. या प्रकरणातील बाकीच्या आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

    • विनय ओझा हे गेल्या ८ वर्षांपासून फरार होते. या प्रकरणातील बाकीच्या आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

टीम इंडियाचा (team india) माजी खेळाडू नमन ओझा (naman ojha) याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. नमनचे वडिल विनय ओझा यांच्यावर बँकेला १.२५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विनय ओझा (vinay ojha bank fraud) यांना मध्यप्रदेशातील बैतुलच्या मुलताई येथून अटक करण्यात आली. अटकेनंतर जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, मात्र तो फेटाळण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

बँक ऑफ महाराष्ट्रच्या (bank of maharashtra) जौलखेडा शाखेत २०१३ मध्ये १.२५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी २०१४ मध्ये तत्कालीन व्यवस्थापक नमनचे वडिल विनय ओझा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर पोलिसांनी ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०बी, ३४ आणि आयटी कलम ६५,६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

विनय ओझा हे गेल्या ८ वर्षांपासून फरार होते. या प्रकरणातील बाकीच्या आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

२०१३ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत शाखा प्रमुख अभिषेक रत्नम यांनी ही फसवणुकीची योजना बनवली होती. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर ओझा आणि इतरांनी मिळून जून २०१३ मध्ये ही फसवणूक केली. आरोपींनी जवळपास ३४ बनावट खाते उघडून त्यावर केसीसी कर्ज हस्तांतरित करत जवळपास सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. त्यावेळी ओझा हे शाखा प्रमुख होते.

एक वर्षानंतर त्यांच्याविरोधात तत्कालीन शाखा प्रमुख रितेश चतुर्वेदी यांनी फसवणुकीची तक्रार नोंदवली होती. बनावट नावे आणि फोटोंच्या आधारावर शेतकरी क्रेडिट कार्ड बनवून बँकेतून पैशांचा व्यवहार करण्यात आला आहे. असे तक्रारीमध्ये नोंदवण्यात आले होते.

नमन ओझाची क्रिकेट कारकिर्द-

नमन ओझा हा भारतातील एक प्रसिद्ध क्रिकेटपटू राहिला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत टीम इंडियाकडून १ कसोटी, १ वनडे आणि २ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय नमनने ११३ आयपीएल सामनेही खेळले आहेत. नमनच्या नावावर कसोटीत ५६, एकदिवसीय सामन्यात १ आणि टी-२० मध्ये १२ धावा आहेत.

तर नमनने आयपीएलमध्ये १ हजार ५५४ धावा केल्या आहेत. ३८ वर्षीय नमनने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

विभाग

पुढील बातम्या