मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  H3N2 Influenza: सावधान..'H3N2' वेगाने पसरतोय, केंद्राकडून नवी नियमावली जाहीर, मास्क वापरण्याचे आवाहन

H3N2 Influenza: सावधान..'H3N2' वेगाने पसरतोय, केंद्राकडून नवी नियमावली जाहीर, मास्क वापरण्याचे आवाहन

Mar 11, 2023, 03:40 PM IST

  • h3n2 influenza virus outbreak : H३N२ इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्र सरकार सतर्क झाले असून सरकारने देशात नवीन नियमावली जाहीर करत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

H3N2 Influenza

h3n2 influenza virus outbreak : H३N२ इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्र सरकार सतर्क झाले असून सरकारने देशात नवीन नियमावली जाहीर करत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

  • h3n2 influenza virus outbreak : H३N२ इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्र सरकार सतर्क झाले असून सरकारने देशात नवीन नियमावली जाहीर करत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली – देशात 'H3N2' व्हायरस झापाट्याने पसरत असून कोरोनानंतर लोकांमध्ये दहशत दिसून येत आहे. या व्हायरसमुळे देशात दोघांचा बळी गेला आहे. केरळ आणि हरियाणा राज्यात दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून सरकारने देशात नवीन नियमावली जाहीर करत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्यांना कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे सुनिश्चित करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना इन्फ्लूएंझा या सारख्या आजारासाठी एक पत्र लिहिले आहे. एच१ एन१ आणि एच ३ एन २ सारख्या गंभीर तीव्र श्वसनाच्या आजारासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन या पत्रातून केले आहे.  काही राज्ये सकारात्मक दरात वाढ नोंदवल्या, असं देखील पत्रात म्हटलं आहे. निती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्र लिहिले आहे.

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन -

H३N२ इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आज महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा निश्चित करावा, रुग्णांची तपासणी करावी, असं सांगितलं आहे.

नीती आयोगाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय -

  • गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा.
  • नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये
  • शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल धरावा.
  • ताप, सर्दी व अंगदुखीची लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

 

Influenza virus H3N2 ची लक्षणे - 

इन्फ्लूएंजा संक्रमणामध्ये ताप, त्याचबरोबर घशात खवखव, खोकला, अंगदुखी व सर्दी सारखी लक्षणे दिसतात. हा व्हायरस म्यूटेट झाला आहे आणि लोकांमध्ये याला प्रतिकार करण्यासाठी इम्यूनिटी कमी झाली आहे. यामुळे या व्हायरस गतीने पसरत आहे. 

Influenza virus H3N2 कसा पसरतो - 

काही वर्षापूर्वी H1N1 व्हायरसमुळे महामारी सुरू झाली होती. H3N2 त्याच व्हायरसचा नवा स्ट्रेन आहे. त्यामुळे हा एक सामान्य इन्फ्लूएंजाचा स्ट्रेन आहे. सध्या याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, कारण व्हायरस म्यूटेट झाला आहे व लोकांमध्ये या नव्या स्ट्रेनचा प्रतिकार करण्यासाठी इम्यूनिटी कमी झाली आहे. 

डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, हा व्हायरस दरवर्षी बदलत असतो. H3N2 व्हायरस इन्फ्लूएंजा व्हायरस कुटूंबातील आहे, जो आपल्या काही उप-प्रकारात म्यूटेट होतो. या व्हायरसमुळे लोकांना रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, याचा अर्थ असा नाही की चिंतेचे काही कारण आहे.

Influenza virus H3N2: व्हायरसपासून कसा कराल बचाव?

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, दोन कारणांमुळे संक्रमण वाढत आहे. पहिले हवामानात झालेला बदल आणि दुसरे म्हणजे कोविडनंतर लोकांनी मास्क वापरणे बंद केले आहे. यामुळे  या व्हायरसपासून वाचण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा, शारीरिक अंतर राखा. त्यांनी सांगितले की, वयोवृद्ध आणि आधीपासूनच आजारी असलेले लोक इन्फ्लूएंजाची लस घेऊ शकतात.

विभाग