मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gyanvapi : ज्ञानवापी प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग, ८ आठवड्यात निर्णय घ्या -SC

Gyanvapi : ज्ञानवापी प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग, ८ आठवड्यात निर्णय घ्या -SC

May 20, 2022, 08:39 PM IST

    • सर्वेच्च न्यायालयाने ज्ञानवापीबाबतचा आपला यापूर्वीचा आदेश कायम ठेवला आहे. वाराणसी सत्र न्यायालय सुनावणी घेऊ शकणार नाही, पुढील ८ आठवड्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम राहणार आहे.
ज्ञानवापी प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग

सर्वेच्च न्यायालयाने ज्ञानवापीबाबतचा आपला यापूर्वीचा आदेश कायम ठेवला आहे. वाराणसी सत्र न्यायालय सुनावणी घेऊ शकणार नाही,पुढील ८ आठवड्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम राहणार आहे.

    • सर्वेच्च न्यायालयाने ज्ञानवापीबाबतचा आपला यापूर्वीचा आदेश कायम ठेवला आहे. वाराणसी सत्र न्यायालय सुनावणी घेऊ शकणार नाही, पुढील ८ आठवड्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम राहणार आहे.

वाराणशी - वाराणसी मधील ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Mosque) व मशीद परिसरात शिवलिंग सापडल्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने तीन पर्याय सूचवले आहे. त्याचबरोबर न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड़ यांनी जिल्हा सत्र न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्रानुसार सुनावणी घ्यावी, असं मत नोंदवले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विटांची भिंत तोडून भरधाव कार घुसली घरात; ३ जण जखमी, कारचा चक्काचूर, पाहा Viral VIDEO

Covishield : कोव्हिशिल्डमुळे मानवी शरीरावर गंभीर परिणाम! हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता; लस घेणाऱ्यांचे टेन्शन वाढले

Viral News : लग्नपत्रिकेवर मोदींचे नाव लिहिणे वराला पडले महागात! अक्षता पडण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने केली 'ही' कारवाई

VIDEO : अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याने घेतली सेल्फी अन् तोडली कारची काच, अभिनेत्याने डोक्यावर मारला हात

सर्वेच्च न्यायालयाने आपला यापूर्वीचा आदेश कायम ठेवला आहे. वाराणसी न्यायालय सुनावणी घेऊ शकणार नाही, पुढील ८ आठवड्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम राहणार आहे. आता हे संपूर्ण प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस डीवाई चंद्रचूड़, जस्टिस नरसिम्हा आणि जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने निर्देश दिले की, खालच्या कोर्टाने मुस्लिम गटाच्या अर्जावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी आणि विषय निकाली काढावा. तसंच, जोपर्यंत सत्र न्यायालय या प्रकरणाच्या अर्जावर निर्णय घेत नाही. तोपर्यंत आमचा अंतरिम आदेश कायम राहणार आहे, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, सत्र न्यायालयाला या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घेण्यास कोणताही दबाव किंवा विशेष आदेश देऊ शकत नाही. कारण ते आपल्या कामात योग्य आहे, सर्व प्रकरण हे जिल्हा कोर्टाकडे वर्ग करण्यात यावे, या प्रकरणावर आठ आठवड्यात सुनावणी घ्यावी, असं निर्देश कोर्टाने दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरण जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग केले असून ते पुढील सुनावणी करतील. शिवलिंगाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जुना आदेश कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालय जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

दरम्यान, वारणासीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम सोमवारी संपले. या सर्वेक्षणाचा शेवट वादळी झाला. तिसऱ्या दिवसाचं सर्वेक्षण समाप्त होताच मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षानं केला आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी पाहणीदरम्यान विहिरीच्या  आत शिवलिंग सापडल्याचा दावा केला. शिवलिंगाच्या संरक्षणासाठी आता सत्र न्यायालयात अर्ज केला जाणार आहे.