मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Surat City: पामतेलात केमिकल टाकून तूप बनवणाऱ्या कंपनीचा भांडाफोड; आरोपींकडून १३ लाखांचं साहित्य जप्त

Surat City: पामतेलात केमिकल टाकून तूप बनवणाऱ्या कंपनीचा भांडाफोड; आरोपींकडून १३ लाखांचं साहित्य जप्त

Jan 25, 2023, 05:16 PM IST

    • Gujarat Crime News : अनेक केमिल्सचा वापर करून बनावट तूप तयार केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कंपनीवर छापेमारी केली आहे.
Surat Gujarat Crime News (HT)

Gujarat Crime News : अनेक केमिल्सचा वापर करून बनावट तूप तयार केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कंपनीवर छापेमारी केली आहे.

    • Gujarat Crime News : अनेक केमिल्सचा वापर करून बनावट तूप तयार केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कंपनीवर छापेमारी केली आहे.

Surat Gujarat Crime News : गरम केलेल्या पामतेलात अनेक प्रकारची केमिल्स टाकून त्यातून बनावट तूप तयार करणाऱ्या एका कंपनीचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. गुजरातमधील सूरत पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट तूप बनवणाऱ्या आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १३ लाखांचं साहित्य जप्त केलं आहे. त्यामुळं आता या कारवाईमुळं सूरतमध्ये खळबळ उडाली असून शहरात मोठ्या प्रमाणात बनावट तूप तयार करणारं रॅकेट काम करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अटक केलेल्या आरोपींच्या कंपनीचीही नोंदणी झालेली आहे की नाही, याचीही पोलिसांकडून तपासणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या सूरतमध्ये बनावट तूप तयार केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शहरातील मांकणा परिसरात छापा मारला. त्यावेळी कोणतंही लेबल नसलेल्या बनावट तूपाचे ६९ डबे पोलिसांना घटनास्थळी आढळून आले. याशिवाय बनावट तूप तयार करण्यासाठी लागणारे केमिकल्स आणि इतर साहित्यही आरोपी वापरत होते. त्यामुळं पोलिसांनी बनावट तूपासह तब्बल १३ लाखांचं साहित्य जप्त केलं आहे. त्यानंतर पोलिसांनी या कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली आहे. आरोपी पामतेलात विषारी रसायनं मिसळून त्यापासून बनावट तूप तयार करायचे. याशिवाय त्यात वेगवेगळ्या फ्लेवरचे गंध टाकून बाजारात विकत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय घटनास्थळावरील १३ लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. आरोपी ज्या कंपनीच्या नावानं बनावट तूप विकत होते, त्या कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची माहिती घेत कारवाई सुरू केली आहे.