मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Republic Day : देवेन भारती यांच्यासह चार जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर, महाराष्ट्राला ७४ पदके

Republic Day : देवेन भारती यांच्यासह चार जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर, महाराष्ट्राला ७४ पदके

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 25, 2023 06:40 PM IST

Presidents police medal : राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली असून देशभरातील एकूण ९०१ पोलिसांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. महाराष्ट्रातील ७४ पदके जाहीर झाली आहेत.

देवेन भारती
देवेन भारती

Presidents police medal : राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली आहेत. देशभरात ९०१ पदके जाहीर झाली असून महाराष्ट्रासाठी ७४ पदके मिळाली आहेत. त्यामध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह चार पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' मिळाले आहे. त्याबरोबरच ३१ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना'पोलीस पदक' जाहीर झाले आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी हे पुरस्कार जाहीर केले जातात.

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. राज्यातील ३१ अधिकारी व शिपायांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

देशातील एकूण ९०१ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून १४० जणांना शौर्य पदक, ९३ जणांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि ६६८ जणांना पोलीस पदक जाहीर झाले आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या