मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गेमिंग APP द्वारे फसवणूक, ED ने टाकलेल्या धाडीत सापडले 17 कोटी; ५ ट्रंक भरून रक्कम

गेमिंग APP द्वारे फसवणूक, ED ने टाकलेल्या धाडीत सापडले 17 कोटी; ५ ट्रंक भरून रक्कम

Sep 11, 2022, 09:45 AM IST

    • ED Raid On Businessman: व्यावसायिक आमिर खानच्या घरी सापडलेल्या रकमेमध्ये ५०० रुपयांच्या नोटा सर्वाधिक होत्या. याशिवाय २०० आणि २ हजार रुपयांच्या नोटाही होत्या. पीएमएलए कायद्यांतर्गत ईडीने ही कारवाई केली होती.
कोलकात्यात व्यावसियाकाच्या घरी सापडली १७ कोटींची रक्कम (ANI)

ED Raid On Businessman: व्यावसायिक आमिर खानच्या घरी सापडलेल्या रकमेमध्ये ५०० रुपयांच्या नोटा सर्वाधिक होत्या. याशिवाय २०० आणि २ हजार रुपयांच्या नोटाही होत्या. पीएमएलए कायद्यांतर्गत ईडीने ही कारवाई केली होती.

    • ED Raid On Businessman: व्यावसायिक आमिर खानच्या घरी सापडलेल्या रकमेमध्ये ५०० रुपयांच्या नोटा सर्वाधिक होत्या. याशिवाय २०० आणि २ हजार रुपयांच्या नोटाही होत्या. पीएमएलए कायद्यांतर्गत ईडीने ही कारवाई केली होती.

ED Raid On Businessman: कोलकात्यातील गार्डनरीच परिसरात इडीने शनिवारी मोठी कारवाई केली. यामध्ये ईडीने १७ कोटी रुपये जप्त केले आहेत. कोलकात्यातील एका व्यावसायिकाच्या घरात १० ट्रंक सापडले. यापैकी ५ ट्रंकमध्ये ही रक्कम होती. व्यावसायिकाचे नाव आमिर खान असं असून तो गार्डन रीच सोसायटीत राहतो.

ट्रेंडिंग न्यूज

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

शनिवारी सकाळी ईडीने कारवाईला सुरुवात केली होती ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ईडीसोबत बँकेचे अधिकारी आणि केंद्रीय सुरक्षा पथकही होते. व्यावसायिकाच्या घरी सापडलेल्या रकमेमध्ये ५०० रुपयांच्या नोटा सर्वाधिक होत्या. याशिवाय २०० आणि २ हजार रुपयांच्या नोटाही होत्या. पीएमएलए कायद्यांतर्गत ईडीने ही कारवाई केली होती.

गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी पार्क स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये आमिर खान आणि इतरांवर फेडरल बँक अथॉरिटीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एफआय़आर नोंदवण्यात आला होता. आमिर खानने मोबाइल गेमिंग अॅप्लिकेशन ई नजेट्स लाँच केले होते. यातून लोकांची फसवणूक करण्याचा उद्देश होता असं ईडीने म्हटलं आहे.

गेमिंग अॅप्लिकेशनच्या माध्यमातून युजर्सचा विश्वास जिंकला. त्यानंतर लोकांनी अॅपच्या माध्यमातून जेव्हा मोठी गुंतवणूक सुरू केली तेव्हा फसवणूक करण्यास सुरुवात झाली. लोकांकडून चांगली रक्कम वसूल केल्यानंतर अचानक अॅपकडून पैसे काढण्याची व्यवस्था बंद केली गेली. यानंतर अॅप्लिकेशनवरून प्रोफाइलसह सर्व डेटा काढून टाकण्यात आला. त्यानंतर युजर्सना त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

फेडरल बँक अथॉरिटीच्या तक्रारीनंतर आमिर खानसह इतर लोकांवर कोलकाता पोलिसात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाची चौकशी करताना ईडी अधिकाऱ्यांना महत्त्वाची माहिती आढळून आली. यात आरोपींकडून बनावट खात्यांचा वापर केला जात होता. ईडीने पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यासह अनेक ठिकाणी छापा टाकला. मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असणाऱ्या काही व्यावसायिकांचा शोधही घेतला जात आहे.

विभाग