मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 11 September 2022 Live: पोलिसांना अरेरावी भोवली,खासदार नवणीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल
MP Navneet Rana (PTI)

Marathi News 11 September 2022 Live: पोलिसांना अरेरावी भोवली,खासदार नवणीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल

Sep 11, 2022, 09:07 PMIST

Marathi News Live Updates : पोलिसांना धमकाल्याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 11, 2022, 09:07 PMIST

स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियानाअंतर्गत  जुहू समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता

स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियानाअंतर्गत रविवारी सकाळी जुहू समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. युनाटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत या अभियानामध्ये के. सी. महाविद्यालयाच्या १०० हून अधिक तरुणांनी सहभागी होत जुहू समुद्र किनारा साफ केला.

<p>स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियान</p>
स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियान

Sep 11, 2022, 03:35 PMIST

Kolhapur : राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले, राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली

कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार सुरूच असून राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या ५ हजार ८८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Sep 11, 2022, 02:47 PMIST

MP Navneet Rana : खासदार नवणीत राणा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

navneet rana news today : पोलिसांना धमकाल्याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एक तरुणी गायब असल्याच्या मुद्द्यावरून लव्ह जिहादचा आरोप करत खासदार राणा यांनी पोलिसांना अरेरावी केली होती.

Sep 11, 2022, 11:28 AMIST

गणेश विसर्जनावेळी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये द्यावेत, काँग्रेसची मागणी

बाप्पाच्या विसर्जनामध्ये २४ लोकांचा मृत्यू झालाय. सार्वजनिक ठिकाणी मृत्यू पावलेल्या लोकांना २५ लाख रुपयांची भरपाई द्यायला हवी. सरकारची जबाबदारी असताना असे मृत्यू होत असतील तर लोकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी कुणाकडे बघायचेय. दहीहंडीच्या कार्यक्रमात मृत्यू झाल्यास भरपाई दिली जाते. तसंच गणेशोत्सवावेळी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये आणि जखमींना १० लाख रुपये द्यावेत अशी आमची मागणी आहे.

Sep 11, 2022, 09:59 AMIST

प्रभादेवीत राडा शिवसैनिकांना महागात, विभागप्रमुखासह ५ जणांना अटक

शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या राडा प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे.दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आपली बाजू ऐकून घेतली नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

Sep 11, 2022, 08:37 AMIST

पापुआ न्यू गिनी भूकंपाने हादरले, ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के

पापुआ न्यू गिनीला रविवारी भूकंपाचे मोठे धक्के बसले. याची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी होती. यानंतर किनारपट्टीवरील भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता धोका टळला असल्याचं युएसजीएसने म्हटलं आहे.

Sep 11, 2022, 08:27 AMIST

US Open : पोलंडची इगा शियांटेकने पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद

पोलंडची टेनिस स्टार वर्ल्ड नंबर वन इगा शियांटेक हिने युएस ओपन महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात तिने ट्युनिशियाच्या ओन्स जेबरला पराभूत केलं. इगाचं हे तिसरं विजेतेपद आहे.

<p>पोलंडच्या इगा शियांटेकला युएस ओपन महिला एकेरीचं विजेतेपद</p>
पोलंडच्या इगा शियांटेकला युएस ओपन महिला एकेरीचं विजेतेपद (REUTERS)

Sep 11, 2022, 08:07 AMIST

Queen Elizabeth II: महाराणी एलिझाबेथ यांचे निधन, भारतात आज राष्ट्रीय दुखवटा

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर भारतात आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे. यानिमित्त राष्ट्रपती भवन, लाल किल्ल्यावरील तिरंगा अर्ध्यावर फडकवला आहे. 

<p>राष्ट्रपती भवनावरील ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला</p>
राष्ट्रपती भवनावरील ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला

Sep 11, 2022, 08:03 AMIST

Shivsena Vs Shinde : शिंदे गट अन् शिवसेनेत राडा, शिंदे गटाच्या आमदाराकडून गोळीबार?

शिवसेना आणि शिंदे गटात मुंबईतील प्रभादेवी परिसरात जोरदार राडा झाला. गणेश विसर्जनावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत वाद झाला होता. त्यानंतर मध्यरात्री या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी पोलिस स्टेशनच्या परिसरात गोळीबार केल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.

    शेअर करा