मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दारुड्या पित्यानं फावड्यानं केले चिमुकल्याचे तुकडे; पोलिसांनी तासाभरात आरोपीला ठोकल्या बेड्या

दारुड्या पित्यानं फावड्यानं केले चिमुकल्याचे तुकडे; पोलिसांनी तासाभरात आरोपीला ठोकल्या बेड्या

Jan 27, 2023, 05:59 PM IST

    • Brutal Murder Of Son : दारुच्या नशेत पित्यानं पोटच्या पोरावर फावड्यानं वार करत हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Fatehpur UP Murder Case (HT_PRINT)

Brutal Murder Of Son : दारुच्या नशेत पित्यानं पोटच्या पोरावर फावड्यानं वार करत हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

    • Brutal Murder Of Son : दारुच्या नशेत पित्यानं पोटच्या पोरावर फावड्यानं वार करत हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Fatehpur UP Murder Case : दारुच्या नशेत असलेल्या पित्यानं आपल्याच चिमुकल्याची फावड्यानं वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपुरमध्ये ही संतापजनक घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली आहे. आरोपीनं आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर पत्नीवरही धारदार शस्त्रानं वार केले आहे. त्यानंतर कुटुंबियांवर हल्ला करून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी काही तासांत बेड्या ठोकल्या आहे. काही दिवसांपूर्वी यूपीच्या मेरठमध्ये दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पित्यानं आपल्याच मुलाची हत्या केल्याची घटना समोर आल्यामुळं फतेहपुरमध्ये खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

Viral News : हनिमूनसाठी बँकॉकला गेली; पतीचे गुपित पुढे आल्याने हैराण झाली पत्नी, उचलले 'हे' पाऊल! वाचा

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील हुसेनगंज परिसरात राहणारा चंद्रकिशोर लोधी हा लुधियानामध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. दुपारी घरातील सर्व लोकांसोबत जेवण केल्यानंतर तो आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन फेरफटका मारण्यासाठी शेतात गेला होता. परंतु शेतात मद्यप्राशन केल्यानंतर चंद्रकिशोरने रागाच्या भरात शेतातील फावड्याच्या सहाय्यानं आपल्याच मुलावर हल्ला चढवला. पित्यानं केलेल्या हल्ल्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चंद्रकिशोर जेव्हा शेतातून घरी परतला तेव्हा त्याच्यासोबत मुलगा नव्हता. त्यामुळं त्याच्या पत्नीनं त्याला याविषयी जाब विचारला असता चंद्रकिशोरने तिच्यावरही धारदार शस्त्रानं वार करायला सुरुवात केली. त्यानंतर महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी भांडणात मध्यस्थी करत तिचा जीव वाचवला.

महिलेसह गावकऱ्यांनी चंद्रकिशोरच्या शेतात धाव घेतली असता त्यांना मुलाच्या शरीराचे तीन तुकडे झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर या प्रकरणाची माहिती समजताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर तातडीनं आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. चंद्रकिशोरने आपल्याच मुलाची हत्या का केली?, त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, परंतु आता फतेहपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.