मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Presidential Election Result : द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती !

Presidential Election Result : द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती !

Jul 21, 2022, 08:36 PM IST

    • राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) यांनी विजय मिळवला आहे. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील.
द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA)उमेदवारद्रौपदी मुर्मू (Draupadimurmu) यांनी विजय मिळवला आहे. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील.

    • राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) यांनी विजय मिळवला आहे. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील.

Presidential Election Result : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसप्रणित यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant sinha) यांना या निवडणुकीत पराभव सहन करावा लागला आहे. सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट झाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Viral news : अन् जंगली हत्ती गावकऱ्यांसोबत चक्क क्रिकेट खेळू लागला…

एक-दोन गुण कमी मिळाले असते तर बरे झाले असते, चेहऱ्यावर उगवलेल्या केसांमुळे ट्रोलिगमुळे टॉपर मुलगी नाराज

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, थोडा ब्रेक घ्या अन् जाऊन पाहा, VIDEO व्हायरल

UP Mobile Blast News: ईअरफोन लावून बाईक चालवत होती महिला, तितक्यात मोबाईलचा स्फोट झाला अन्...

सोमवारी पार पडलेल्या या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले होते. राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मुर्मू आघाडीवर होत्या. तिसऱ्या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांमधील ५० टक्के मते मिळाली आणि त्यांचा विजय निश्चित झाला.

विजयासाठी भाजपची मजबूत मोर्चेबांधणी -

मतमोजणी आधीच द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) यांचा विजय निश्चित मानला जात होता. कारण भाजपने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विजय मिळावा यासाठी प्रचंड मोर्चोबाधणी केलेली होती. या निवडणुकीत १७ खासदारांनी आणि १०० हून अधिक विविध पक्षांच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिल्या आदिवासी समाजाच्या महिला या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत. विशेष म्हणजे देशासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की, द्रौपदी मुर्मू या देशाच्या प्रतिभा पाटील यांच्यानंतर दुसऱ्या महिला राष्ट्रपती असणार आहेत.

द्रौपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत ५४० खासदारांची मतं मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना  २०८  खासदारांची मतं मिळाली. द्रौपदी यांना पहिल्या फेरीत मिळालेल्या मतांचं मूल्य ३ लाख ७८ हजार तर यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांचं मूल्य १ लाख ४५ हजार इतकं होतं. पहिल्या फेरीत  १५ मते रद्द झाली.

२५ जुलै रोजी मुर्मू स्वीकारणार पदभार -

या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच द्रौपदी मुर्मू आघाडीवर होत्या. 

राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. द्रौपदी मुर्मू विजयानंतर आता २५ जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. त्याआधी म्हणजे २४ जुलै रोजी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.