मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जमीन हादरत असतानाही डॉक्टरांनी ऑपरेशन सुरुच ठेवलं; मृत्यूला न घाबरता कर्तव्यासाठी दाखवला जिगरा

जमीन हादरत असतानाही डॉक्टरांनी ऑपरेशन सुरुच ठेवलं; मृत्यूला न घाबरता कर्तव्यासाठी दाखवला जिगरा

Mar 22, 2023, 02:17 PM IST

  • Earthquake In JK : भूकंपामुळं इमारती हादरत असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णाचा जीव वाचवण्यासाची शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचं कौतुक केलं जात आहे.

Jammu-Kashmir (HT)

Earthquake In JK : भूकंपामुळं इमारती हादरत असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णाचा जीव वाचवण्यासाची शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचं कौतुक केलं जात आहे.

  • Earthquake In JK : भूकंपामुळं इमारती हादरत असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णाचा जीव वाचवण्यासाची शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचं कौतुक केलं जात आहे.

Earthquake In Jammu-Kashmir : पाकिस्तान, अफगाणिस्तानसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे जबर धक्के बसले आहे. जम्मू-काश्मिर, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरं भूकंपानं हादरल्यामुळं घाबरलेल्या नागरिकांनी संपूर्ण रात्र बाहेर जागून काढली आहे. याशिवाय तुर्की आणि सीरिया या देशातील भूकंपामुळं हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळं अनेक नागरिक भूकंपाच्या दहशतीखाली वावरत आहेत. परंतु आता भूकंपाचे धक्के बसत असतानाही डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णाचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. काश्मिरच्या अनंतनागमधील एका रुग्णालयात ही घटना घडली असून त्यानंतर अनेकांनी डॉक्टरांचं कौतुक केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

काल रात्री उत्तर भारतासह काश्मिरच्या अनेक जिल्ह्यांना भूकंपाचे हादरे बसले. त्यामुळं घाबरलेल्या नागरिकांनी जीवाच्या आकांतानं घराच्या बाहेर धाव घेतली. परंतु ज्यावेळी भूकंपाचे धक्के बसत होते, त्याचवेळी अनंतनागच्या एका रुग्णालयात डॉक्टरांकडून रुग्णावर ऑपरेशन सुरू होतं. जमीन हादरत असल्याचं लक्षात आल्यानंतरही डॉक्टरांनी घाबरून न जाता मोठ्या धैर्यानं रुग्णाचं ऑपरेशन जारी ठेवलं. रुग्णालयातील कर्मचारी जीव वाचवण्यासाठी बाहेर पळत असतानाही डॉक्टर शांतपणे रुग्णाचं ऑपरेशन करत होते. काही वेळानं भूकंपाचे धक्के थांबले, तोपर्यंत डॉक्टरांनी ऑपरेशनची प्रक्रिया पार पाडली होती. त्यामुळं आता जीव धोक्यात घालून कर्तव्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या अनंतनागमधील डॉक्टरांचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक केलं जात आहे.

Earthquake In Jammu-Kashmir : पाकिस्तान, अफगाणिस्तानसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे जबर धक्के बसले आहे. जम्मू-काश्मिर, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरं भूकंपानं हादरल्यामुळं घाबरलेल्या नागरिकांनी संपूर्ण रात्र बाहेर जागून काढली आहे. याशिवाय तुर्की आणि सीरिया या देशातील भूकंपामुळं हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळं अनेक नागरिक भूकंपाच्या दहशतीखाली वावरत आहेत. परंतु आता भूकंपाचे धक्के बसत असतानाही डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णाचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. काश्मिरच्या अनंतनागमधील एका रुग्णालयात ही घटना घडली असून त्यानंतर अनेकांनी डॉक्टरांचं कौतुक केलं आहे.

काल रात्री उत्तर भारतासह काश्मिरच्या अनेक जिल्ह्यांना भूकंपाचे हादरे बसले. त्यामुळं घाबरलेल्या नागरिकांनी जीवाच्या आकांतानं घराच्या बाहेर धाव घेतली. परंतु ज्यावेळी भूकंपाचे धक्के बसत होते, त्याचवेळी अनंतनागच्या एका रुग्णालयात डॉक्टरांकडून रुग्णावर ऑपरेशन सुरू होतं. जमीन हादरत असल्याचं लक्षात आल्यानंतरही डॉक्टरांनी घाबरून न जाता मोठ्या धैर्यानं रुग्णाचं ऑपरेशन जारी ठेवलं. रुग्णालयातील कर्मचारी जीव वाचवण्यासाठी बाहेर पळत असतानाही डॉक्टर शांतपणे रुग्णाचं ऑपरेशन करत होते. काही वेळानं भूकंपाचे धक्के थांबले, तोपर्यंत डॉक्टरांनी ऑपरेशनची प्रक्रिया पार पाडली होती. त्यामुळं आता जीव धोक्यात घालून कर्तव्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या अनंतनागमधील डॉक्टरांचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक केलं जात आहे.

|#+|

भूकंप सुरू असताना महिलेची प्रसूती...

काश्मिरच्या पहलगाम जिल्ह्यातील एका रुग्णालयात भूकंपाचे धक्के बसत असतानाही डॉक्टरांनी एका महिलेची प्रसूती केली आहे. काही वेळानं भूकंप थांबल्यानंतर जन्मलेल्या बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयात अनेकांनी गर्दी केली होती. त्यामुळं आता नैसर्गिक संकटं आलेली असतानाही जिवाची पर्वा न करता कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या अनंतनाग आणि पहलगाम जिल्ह्यातील डॉक्टरांच्या कार्याला अनेकांनी सोशल मीडियावर सलाम केला आहे.