मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Osho Ashram : पुण्यात ओशो आश्रमात राडा; आंदोलक भाविकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; अनेक आंदोलकांना अटक

Osho Ashram : पुण्यात ओशो आश्रमात राडा; आंदोलक भाविकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; अनेक आंदोलकांना अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 22, 2023 01:58 PM IST

Osho Ashram : ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले.

Osho Ashram
Osho Ashram

पुणे : ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले. काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर १५० ते २०० ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माला घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला.

आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करणाऱ्या अनुयायांनी बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. पोलिसांनी वारंवार समजूत काढूनही अनुयायी आपल्या मागण्यांवर ठाम होते. ओशो आश्रमाच्या बचावासाठी व्यवस्थापन विरोधातजोरदार घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले आहे. या लाठीमारात अनेक अनुयायी गंभीर जखमी झाले आहेत.

आचार्य रजनीश ओशो यांच्या शिष्यांनी कोरेगाव पार्क येथील आश्रमात आंदोलन केले होते. यावेळी शिष्यांच्या एकजुटीपुढे आश्रम व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत शिष्याना संन्याशी माळा घालून आतमध्ये प्रवेश दिला होता. ७० व्या ओशो संबोधी दिवसानिमित्त कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमाच्या गेटवर जगभरातून दोन ते अडीच हजार ओशो शिष्य दाखल झाले होते.

ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना ओशोंची माळा गळ्यात घालून प्रवेश प्रतिबंध करण्याच्या, ओशो जयंती, ओशो महापरिनिर्वाण, गुरुपौर्णिमा, ओशो संबोधी दिवस असे कुठल्याही प्रकारचे उत्सव साजरे न करणे, तसेच आश्रमाची जागा विक्रीला काढून ओशो विचार संपवण्याच्या प्रयत्नाच्या विरोधात ओशोंच्या शिष्यांनी एकत्र येऊन निदर्शनेही केली होती.

ळी बोलताना स्वामी चैतन्य कीर्ती म्हणाले, ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना ओशो प्रेमींना गळ्यामध्ये माळा घालून आश्रमात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. आश्रमाची जागा विकण्यासाठी काढली आहे. या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे. अतिशय शांततापूर्ण मार्गाने आम्ही आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन करत आहोत. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आश्रम व्यवस्थापनाने आज आम्हाला आतमध्ये प्रवेश करण्यास मुभा दिली आहे. आमच्या लढ्याला काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, आश्रम आणि ओशो विचार वाचवण्याचा आमचा लढा यापुढेही चालू राहणार आहे."

अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर व्यवस्थापनाने आश्रमात प्रवेश करण्यास मुभा दिल्याने ओशो शिष्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. परंतु, आश्रमाच्या आतील समाधीची, स्विमिंग पूल व ध्यान केंद्रांची बिकट झालेली अवस्था पाहून शिष्यानी नाराजी व्यक्त केली. ओशो आश्रमाला पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्यासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे अनेकांनी व्यक्त केले.

IPL_Entry_Point

विभाग