मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP status : राष्ट्रवादी काँग्रेसचा 'राष्ट्रीय पक्ष' हा दर्जा धोक्यात; निवडणूक आयोग घेणार फेरआढावा

NCP status : राष्ट्रवादी काँग्रेसचा 'राष्ट्रीय पक्ष' हा दर्जा धोक्यात; निवडणूक आयोग घेणार फेरआढावा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 22, 2023 01:06 PM IST

NCP National Party Status : निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाची फेर तपासणी करणार आहे. यामुळे या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात आला आहे.

 NCP Chief Sharad Pawar
NCP Chief Sharad Pawar (PTI)

NCP National Party Status : निवडणूक आयोग देशातील चार पक्षांचा राष्ट्रीय पक्ष दर्जाची फेर तपासणी करणार आहे. या संदर्भात त्यांनी या चारही पक्षाच्या नेत्यांना बोलावून घेत त्यांची बाजू ऐकून घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा कायम ठेवावा का, याचा आढावा घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी सोबत भाकपसह आणि चार पक्षांवर त्यांचा राष्ट्रीय पक्ष गमावण्याचे संकट ओढवले आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत ४ किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये किमान ६ टक्के मते मिळणे गरजेचे असते. तसेच लोकसभेच्या किमान चार जागा जिंकणे देखील महत्वाचे असते. देशातील काही राष्ट्रीय पक्ष या अटींची पूर्तता करत नसल्याने या दर्जाचा फेर तपासणीचा आढावा निवडणूक आयोग घेणार आहे. यात भाकप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसह आणखी चार पक्षाचा समावेश आहे. या पक्षाला मिळालेला एकूण मतदानाचा टक्का दोन ते अडीचच्या जवळपास आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन दिल्यावर त्यावर मंगळवारी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. आयोगाने निर्णयाचा फेरआढावा अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल व अन्य काही नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या बैठकीत उपस्थिती लावली.

आयोगाने सप्टेंबर २०१९मध्ये राष्ट्रवादीसह मायावती यांचा बसप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) व तृणमूल काँग्रेस यांनाही सुनावणीसाठी समन्स बजावले होते. त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेऊ नये, अशी नोटीस आयोगाने तिन्ही पक्षांना बजावली होती.

IPL_Entry_Point

विभाग