मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime : मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याची बतावणी करत महिलेला २० लाखांनी गंडवले

Mumbai Crime : मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याची बतावणी करत महिलेला २० लाखांनी गंडवले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 22, 2023 11:12 AM IST

Mumbai Crime : मुंबईत क्राइमब्रांच मधून बोलत असल्याची बतावणी करत एका महिलेला २० लाख रुपयांनी गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे.

 crime news
crime news

मुंबई : मुंबई क्राइम ब्रांच मधून बोलत असल्याची बतावणी करत एका महिलेला तब्बल २० लाखांनी गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या महिन्याभरच्या कालावधीत अशा प्रकारे फसवणूक केल्याची ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुग्राम सेक्टर ४३ मध्ये राहणाऱ्या एका महिलेला ३ मार्च रोजी एका कुरिअर कंपनीतून फोन आला. तुमचं एक पार्सल मुंबईमध्ये आहे. हे पार्सल पोलिसांनी जप्त केले आहे. त्यासाठी तुमच्या आधार कार्डची माहिती हवी आहे. महिलेला तिच्या आधार कार्डची माहिती मागितली. महिलेने सहनिशा न करता आधारकार्डची माहिती दिली. यानंतर त्यांनी फोन ठेवून दिला. थोड्याच वेळाने त्यांना पुन्हा फोन आला. यावेळी त्यांना मुंबई पोलिस गुन्हे शाखेतून पोलीस उपायुक्त बलसिंग राजपूत बोलत असून त्यांच्या तीन खात्यातून मनी लॉंडरिंग झाल्याचे सांगितले. 

महिलेने अशा कोणत्याही बॅंकेत खाते नसल्याचे सांगताच तिला धमकावून टप्प्या टप्याने एकूण २० लाख रुपये एका बॅंक खात्यात जमा करण्यास सांगितले. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या महिलेने पैसे जमा केले. यानंतर तिने गुरूग्राम पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वीही बंगळुरूमध्ये मुंबई गुन्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी करत एका ४२ वर्षीय महिला अकाउंटंटला सुमारे ११ लाखांनी गंडा घालण्यात आला होता.

IPL_Entry_Point

विभाग