इस्लामाबाद : शेजारी राष्ट्रांत अराजक माजले आहे. इम्रान खान यांच्या अटकेवरून गृह युद्धाच्या उंबरठ्यावर पाकिस्तान असतांना आता देशात दशतवादी कारवाया देखील वाढल्या आहेत. पाकिस्तान तैहरिके ए इन्साफचे नेते आतिफ मुंसिफ हे क्रिकेट खेळून येत असतांना दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्या गाडीवर रॉकेट हल्ला केला. यात त्यांच्यासह १० नागरिक ठार झाले आहेत.
आतिफ मुंसिफ हे विरोधी पार्टी पीटीआयचे एबटाबाद येथील नेते होते. त्यांच्या विरोधकांनी हा हल्ला केला असून यात ते ठार झाले आहेत. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार एबटाबाद येथील डिपीओ उमर तूफैल म्हणाले की, हवेलिया तहसीलचे मेयर आतिफ हे कारमाडून जात असतांना दहस्तवाद्यांनी त्यांच्या गाडीच्या इंधन टाकीवर गोळी झाडली. यानंतर त्यात स्फोट झाला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ही कार संपूर्ण खाक झालेली दिसते. डॉनने दिलेल्या वृतानुसार दोन जखमी नागरिकांना जवळील रुग्णालयात भरती करण्यात आले. तर शवविच्छेदनासाठी सर्व मृतदेह हे एबटाबाद येथील जिल्हा रुग्णालयात नेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केला आहे. काही जणांनी दिलेल्या वृतानुसार आतिफ यांच्या गाडीवर रॉकेट हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे.
आतिफ मुंसिफ यांनी २०२२ मध्ये खैबर पख्तुनख्वा येथील स्थानिक निवडणुकांत सहभाग घेत अपक्ष म्हणून निवडणून आले होते. यानंतर त्यांनी पीटीआय या पक्षात प्रवेश घेतला होता. त्यांचे वडील मुंसिफ खान जादुन हे केपी विधानसभेचे माजी आमदार होते तसेच प्रांतीय मंत्री देखील होते. १९९० च्या दशकात त्यांची देखील विरोधकांनी हत्या केली होती. डॉनने दिलेल्या वृतानुसार या हल्ल्यानंतर मुंसिफ यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यात त्यांच्या मृत्यू पूर्वी काही तासा आधी त्यांनी लंगडा गावातील मुलासोबत क्रिकेट खेळतांना दिसत आहेत.
संबंधित बातम्या