मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  samruddhi mahamarg : समृद्धी हायवेवर वेगमर्यादेचं उल्लंघन केल्यास १ तास थांबवून धडे दिले जाणार

samruddhi mahamarg : समृद्धी हायवेवर वेगमर्यादेचं उल्लंघन केल्यास १ तास थांबवून धडे दिले जाणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 22, 2023 01:21 PM IST

samruddhi mahamarg news : समृद्धी महामार्गावर अपघात वाढले आहे. या मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी वाहन चलकांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

samruddhi mahamarg inauguration
samruddhi mahamarg inauguration (HT)

नागपूर : समृद्धी महामार्गावर उद्घाटन झाल्यापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. या कालावधीत तब्बल ३१ प्राणांतिक अपघात झाले आहेत. या आपघातांना विविध घटक कारणीभूत आहेत. या अपघातांची दखल प्रशासनाने घेतली असून येथील अपघात कमी करण्यासाठी आता वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. या मार्गावरून मुंबईला ७ तासांत पोहचता येतं. हा मार्ग प्रशस्त असून तब्बल १०० ते १२० वेगाने या मार्गावरून वाहने मार्गक्रमण करत असतात. तब्बल तीन अभ्ययारण्यातून हा मार्ग जातो. हा मार्ग खुला करण्यात आल्या पासून अपघातांची मालिका सुरू आहे.

तीन महिन्याच्या कालावधीत अनेक अपघात तब्बल ३१ अपघात झाले आहेत. यात अनेक जन ठार झाले आहेत. हे वाढते अपघात चिंताजनक बाब असल्याने अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच महत्वाचा भाग म्हणजे या मार्गावरून वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. नागपूर ते शिर्डी मार्गावर ८ समुपदेशन केंद्र उभारले जाणार आहे. या बाबतचा निर्णय मंगळवारी नागपुरात परिवहन खाते व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) बैठकीत घेण्यात आला.

समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे व उपाययोजनांसाठी परिवहन उपायुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर यांनी सोमवारी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यानंतर कळसकर यांनी आरटीओ अधिकारी आणि ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुढील सात दिवसांत ‘एमएसआरडीसी’ला प्रत्येक जिल्ह्यात एक प्रमाणे नागपूर ते शिर्डी दरम्यान ८ समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांना सक्तीने रोखून या केंद्रावर आणून ३० मिनिटे ते १ तास त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग