मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  देशात कोरोनाचा उद्रेक, २४ तासात नव्या रुग्णसंख्येत ४५ टक्क्यांची वाढ

देशात कोरोनाचा उद्रेक, २४ तासात नव्या रुग्णसंख्येत ४५ टक्क्यांची वाढ

Jun 27, 2022, 10:16 AM IST

    • महाराष्ट्रात सर्वाधिक ६ हजार ४९३ कोरोनाबाधित आढळले. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
India Corona Update (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

महाराष्ट्रात सर्वाधिक ६ हजार ४९३ कोरोनाबाधित आढळले. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

    • महाराष्ट्रात सर्वाधिक ६ हजार ४९३ कोरोनाबाधित आढळले. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

देशातील कोरोनाबाधितांची (Corona Update) संख्या वाढत चालली असून गेल्या २४ तासात तब्बल ४५ टक्के रुग्णसंख्या वाढली आहे. काल दिवसभरात भारतात १७ हजार ७३ नवे रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढीचं प्रमाण हे ४५.५ टक्के इतकं आहे. कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमसुद्धा देशात वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १ अब्ज ९७ कोटी ११ लाख ९१ हजार ३२९ लशींचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासात २ लाख ४९ हजार ६४६ जणांना लस देण्यात आली. (India Corona update)

ट्रेंडिंग न्यूज

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

कोरोनाची रुग्णसंख्या आढळण्याचा सध्याचा दर हा प्रतिदिन ३.३९ टक्के इतका आहे. देशात चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली असून गेल्या २४ तासात देशात ३ लाख ३ हजार ६०४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत ८६.१० कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ९४ हजार ४२० इतकी आहे. गेल्या २४ तासात १५ हजार २०८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत देशात ४ कोटी २७ लाख ८७ हजार ६०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

रविवारी देशात ११ हजार ७३९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सोमवारी आलेल्या आकडेवारीनुसार त्यात ४५ टक्के वाढ झाल्याचं दिसतं. महाराष्ट्रात सर्वाधिक ६ हजार ४९३ कोरोनाबाधित आढळले. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने शनिवारी आयसीएमआरच्या पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटीमुळे ज्या रुग्णांची नोंद केली नव्हती त्यांची नोंद रविवारी करण्यात आली. महाराष्ट्रात सक्रीय रुग्णांची संख्या २४ हजार ६०८ इतकी आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण आकडेवारी ७७ लाख ९० हजार १५३ इतकी झाली आहे.

विभाग