मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  CoronaVirus : कोरोना व्हायरसने पुन्हा वाढवले टेन्शन; ‘या’ दिवशी संपूर्ण देशभरात होणार मॉक ड्रिल

CoronaVirus : कोरोना व्हायरसने पुन्हा वाढवले टेन्शन; ‘या’ दिवशी संपूर्ण देशभरात होणार मॉक ड्रिल

Mar 25, 2023, 07:05 PM IST

  • Covid 19 cases in india : कोरोना विषाणू व फ्लूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Covid 19 cases in india

Covid 19 cases in india : कोरोना विषाणू व फ्लूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

  • Covid 19 cases in india : कोरोना विषाणू व फ्लूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नवी दिल्ली– गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून नसल्यात जमा असलेल्या कोविड संक्रमणाने देशात पुन्हा डोकं वर काढल्याने देशवासीयांची चिंता वाढली आहे. कोरोना विषाणू व फ्लूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नियमावलीमध्ये लोकांना कोविडसाठी निश्चित केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच शिंकताना तसेच खोकताना तोंडावर रुमाल धरण्याचे आवाहन केले आहे. हात वारंवार धुण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, टेस्टींग आणि लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच श्वसनाचे आजार असल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. कोरोना रुग्णाची वाढती संख्या  पाहता पुढील महिन्यात १० आणि ११ एप्रिल रोजी राष्ट्रीय स्तरावर या संकटाचा सामना करण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येणार आहे. मॉक ड्रिलमध्ये आयसीयू बेड, वैद्यकीय उपकरणे,  ऑक्सिजन आणि मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत आढावा घेतला जाणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवार (२७ मार्च) रोजी सायंकाळी साडे चार वाजता राज्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली आहे. या बैठकीत मॉक ड्रिलशी संबंधित सर्व माहिती शेअर केली जाणार आहे.

देशात शनिवारी कोविड-१९ चे १,५९० नवीन रुग्ण आढळून आले, जे गेल्या १४६ दिवसांतील सर्वाधिक आहेत, तर सक्रीय रुग्णांची संख्या ८,६०१ वर पोहोचली आहे. 

कोरोना विषाणुचे वाढते संक्रमण पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मोदींनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, कोविड-१९ अजून संपलेला नाही. त्यामुळे जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट वाढवण्याबरोबरच कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.