मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BBC Documentary : भारतापासून ब्रिटनपर्यंत गदारोळ माजवणाऱ्या बीबीसीच्या 'त्या' डॉक्युमेंट्रीत असं आहे तरी काय ?

BBC Documentary : भारतापासून ब्रिटनपर्यंत गदारोळ माजवणाऱ्या बीबीसीच्या 'त्या' डॉक्युमेंट्रीत असं आहे तरी काय ?

Jan 23, 2023, 01:41 PM IST

    • BBC Documentary On 2002 Gujarat Riots : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसीनं २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीवर 'इंडिया- द मोदी क्वेशन' नावाचा माहितीपट प्रदर्शित केल्यानंतर त्यावरून वाद पेटलेला आहे.
BBC Documentary On 2002 Gujarat Riots (HT)

BBC Documentary On 2002 Gujarat Riots : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसीनं २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीवर 'इंडिया- द मोदी क्वेशन' नावाचा माहितीपट प्रदर्शित केल्यानंतर त्यावरून वाद पेटलेला आहे.

    • BBC Documentary On 2002 Gujarat Riots : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसीनं २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीवर 'इंडिया- द मोदी क्वेशन' नावाचा माहितीपट प्रदर्शित केल्यानंतर त्यावरून वाद पेटलेला आहे.

दिल्ली : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसीनं २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीवर 'इंडिया- द मोदी क्वेशन' नावाचा माहितीपट प्रदर्शित केल्यानंतर त्यावरून वाद पेटलेला आहे. केंद्र सरकारने आपल्या विशेष अधिकाराचा वापर करत बीबीसीच्या या माहितीपटावर यूट्यूबसह ट्विटरवरही बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. गुजरातमध्ये झालेल्या दंगलीच्या काळात तात्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर बीबीसीनं माहितीपटातून प्रपोगंडा दाखवल्याचा आरोप करत सरकारनं भारतात त्याच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. एवढेच नाही तर या महितीपटावरून भारत आणि इंग्लंड या दोघांचेही संबंध ताणले गेले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

Heat Wave Alert : मे महिन्यातही सूर्य कोपणार! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट

Vande Bharat Metro : वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लुक आला समोर, लवकरच होणार लाँच; पाहा VIDEO

IRCON Recruitment 2024: भारतीय रेल्वेत असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; पगार १ लाख ४० हजार!

बीबीसीने 'इंडिया : द मोदी क्वेस्चन' नामक माहिती पट हा दोन भागात बनवला आहे. यात मोदी यांचा राजकारनातील प्रवेश आणि पक्षातील वाढते स्थान आणि गोध्रामधील रेल्वे जळीतकांडानंतर गुजरातमधील अनेक भागांमध्ये उसळलेल्या दंगलीबाबत राजकीय नेते, पत्रकार, दंगलीत प्राण गमावलेल्यांचे नातेवाईक आणि तुरुंगात असलेले पोलीस अधिकारी संजीव भट यांच्या मुलीची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे. गुजरात दंगलीत निष्पाप लोकांचा जीव जात असताना तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका संशयास्पद होती, अशा प्रकारचं चित्रण बीबीसीच्या माहितीपटात करण्यात आलं आहे. या माहिती पटात इंग्लंडचे माजी विदेश सचिव जॅक स्त्रा यांची मुलाखत आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की इंग्लंडच्या सरकारने गुजरात दंगलीची चौकशी केली होती.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, या माहिती पटात माहिती चुकीची सादर करण्यात आली आहे. हा माहितीपट म्हणजे प्रोपोगंडा आहे. हे करण्यामागे बीबीसीचा हेतु काय आहे हे स्पष्ट होत आहे. बीबीसीने एक वाईट गोष्ट चुकीच्या पद्धतीने दाखवली आहे.

अनेक भारतीयांनी देखील या माहिती पटवरून बीबीसी आणि इंग्लंड सरकारला धारेवर धरले आहे. माजी भारतीय राजदूत भास्वती मुखर्जी म्हणाले, की बीबीसी हा भारताच्या अंतर्गत प्रशांमद्धे हस्तक्षेप करत आहेत. रॉचे माजी प्रमुख संजीव त्रिपाठी म्हणाले की, या प्रकारच्या माहिती पटांची निंदा करायला हवी.

भाषाने दीलेल्या महितीनुसार शनिवारी ३०२ माजी न्यायाधीश आणि काही माजी सनदी अधिकाऱ्यांनी देखील बीबीसीच्या या माहिती पटाची निंदा केली आहे. हा प्रकार म्हणजे ब्रिटिशांची फोडा आणि झोडा रणनीती असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारनं यूट्यूबसह माहितीपटाची लिंक असलेल्या ५० हून अधिक ट्विट्सला ब्लॉक करण्याचे निर्देश दिले असून त्यानंतर यूट्यूब आणि ट्विटरनं तातडीनं कार्यवाही करत माहितीपटाच्या लिंक्स ब्लॉक केल्या आहेत. बीबीसीनं तयार केलेली 'इंडिया- द मोदी क्वेशन' डॉक्यूमेंटरी दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यामुळं आता केंद्र सरकारनं माहितीपटाला ब्लॉक करण्याचा आदेश काढल्यामुळं त्याला भारतात पाहता येणार नाही.

विभाग