मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Modi Golden Statue : पंतप्रधान मोदींची बनवली सोन्याची मूर्ती, वजन ठेवले १५६; जाणून घ्या कारण

Modi Golden Statue : पंतप्रधान मोदींची बनवली सोन्याची मूर्ती, वजन ठेवले १५६; जाणून घ्या कारण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 21, 2023 08:49 PM IST

PM Narendra Modi Golden Statue : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एका भक्ताने मंदिर बांधल्याचे आपण ऐकले असेलच आता गुजरातमधील एका समर्थकाने मोदींची १५६ ग्राम वजनाची सोन्याची मूर्ती बनवली आहे.

पंतप्रधान मोदींची बनवली सोन्याची मूर्ती
पंतप्रधान मोदींची बनवली सोन्याची मूर्ती

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भक्तांमध्ये काही कमी नाही. काही आंतरराष्ट्रीय संस्थाही पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेबाबत मोठ मोठे दावे करतात. दरम्यान मोदींच्या गुजरातमधील एका समर्थकाने पीएम मोदींसाठी असे काही केले आहे की, ज्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष त्याच्याकडे आकर्षित झाले आहे. गुजरातच्या एका सराफाने पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती बनवली आहे. मोदींच्या या मूर्ती जोरदार चर्चा होत आहे.

१५६ जागा जिंकल्यामुळे मूर्तीचे वजन १५६ ग्राम -

गुजरातमधील सूरत शहरात असणाऱ्या एका सराफा व्यावसायिकाने नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवल्याच्या खुशीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची १५६ ग्राम वजनाची सोन्याची मूर्ती बनवली आहे. सोन्या-चांदीचे दागिने तयार करणारी कंपनी ‘राधिका चेन्स’ चे मालक वसंत बोहरा यांनी म्हटले की, १८ कॅरेट सोन्यापासून बनवलेली ही मूर्ती १५६ ग्राम वजनाची आहे. कारण मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये भाजपने गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी १५६ जागांवर विजय मिळवला आहे.

२० कारागिरांनी ३ महिन्यात बनवली मूर्ती –

अनेक लोकांनी मोदींची ही प्रतिमा खेरदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र सराफा व्यावसायिकाने अजूनपर्यंत याची विक्री करण्याचा निर्णय घेतला नाही.बोहरायांनी म्हटले की, मी नरेंद्र मोदींची समर्थक असून त्यांच्या सन्मान करण्यासाठी काहीतरी तयार करण्याची इच्छा होती. आमच्या कंपनीच्या २० कारागिरांना ही मूर्ती बनवण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला.

मूर्तीची किंमत ११ लाख रुपये -

बोहरायांनी सांगितले की, ही मूर्ती तयार करण्यासाठी १० लाख ५० हजार रुपये खर्चझाले आहेत. त्यांनी सांगितले की, माझा एक मित्र ही मूर्ती खरेदी करणार आहे. आम्ही ही मूर्ती बनवण्यासाठी १० लाख रुपये खर्च केले असून याची किंमत ११ लाख रुपये लावली आहे. माझ्या मित्राने सांगितले की, तो ही मूर्ती पंतप्रधान मोदींना भेट करणार आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या