मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nehru Or Modi : नेहरू की मोदी...कोणाची राजकीय उंची अधिक? काँग्रेस-भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर

Nehru Or Modi : नेहरू की मोदी...कोणाची राजकीय उंची अधिक? काँग्रेस-भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर

May 28, 2023, 11:58 PM IST

  • Bjp vs congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची युद्ध रंगले आहे. ट्विटर या माध्यमावर दोन्ही पक्षांची लढाई रंगली आहे

Bjp vs congress

Bjp vs congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची युद्ध रंगले आहे. ट्विटर या माध्यमावर दोन्ही पक्षांची लढाई रंगली आहे

  • Bjp vs congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची युद्ध रंगले आहे. ट्विटर या माध्यमावर दोन्ही पक्षांची लढाई रंगली आहे

BJP vs Congress : आज देशाला नवीन संसद भवन मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची युद्ध रंगले आहे. ट्विटर या माध्यमावर दोन्ही पक्षांची लढाई रंगली आहे. काँग्रेसने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो शेअर केला असून त्यात पंतप्रधान मोदींची प्रतिमा नेहरूंसमोर खूपच छोटी दाखवली आहे. याला पलटवार करत भाजपने प्रत्युत्तर देत पंडित नेहरूंची रील लाइफमध्ये खूप उंची दाखवली, तर खऱ्या आयुष्यात ते खूपच लहान असल्याचे दाखवण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vande Bharat: जे कधी झाले नाही ते आता होणार, वंदे भारतच्या माध्यमातून भारत चीनचे वाढवणार टेन्शन, ते कसे काय?

Karnataka Sex Scandal : क्लिप व्हायरल झाल्यापासून महिला सोडतायत घर, पती करतायत प्रज्वल रेवण्णाशी संबंधांची चौकशी

ICSE ISC Result: सीआयएससीई बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीचं मारली बाजी!

10th Passed Job: दहावी उतीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख!

 

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी काँग्रेसने एक जवाहरलाल नेहरुंचा फोटो ट्विटरवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले, "तुम्ही कितीही प्रयत्न करा". या चित्रात पंतप्रधान मोदी आणि पंडित नेहरू दाखवले आहेत. पंतप्रधान मोदींना पंडित नेहरूंच्या पायाजवळ छोट्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. तर नेहरूंचा आकार खूप जास्त दाखवण्यात आला आहे.

 

काँग्रेसला भाजपकडून प्रत्युत्तर -
यानंतर भाजपनेही जवाहरलाल नेहरूंचा एक फोटो अपलोड केला, ज्यात कॅमेरा फोकसमध्ये त्यांचा मोठा फोटो आणि खऱ्या आयुष्यात लहान फोटो दाखवला आहे. भाजपने हा फोटो 'reel vs real'  टॅगसह शेअर केला आहे. भाजपने या फोटोसोबत नेहरूंचे सत्य, कॅप्शन लिहिले.