मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अब्जाधीश बिल गेट्स ६७ व्या वर्षी पुन्हा प्रेमात; ६० वर्षीय मैत्रिणीला करतायत डेट, कोण आहे माहित्येय?

अब्जाधीश बिल गेट्स ६७ व्या वर्षी पुन्हा प्रेमात; ६० वर्षीय मैत्रिणीला करतायत डेट, कोण आहे माहित्येय?

Feb 09, 2023, 08:11 PM IST

  • Bill gates in Love : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक व जगातील अब्जाधीशांपैकी एक असलेले बिल गेट्स वयाच्या ६७ व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडले आहेत.

Bill gates

Bill gates in Love : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक व जगातील अब्जाधीशांपैकी एक असलेले बिल गेट्स वयाच्या ६७ व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडले आहेत.

  • Bill gates in Love : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक व जगातील अब्जाधीशांपैकी एक असलेले बिल गेट्स वयाच्या ६७ व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडले आहेत.

Bill gates in Love : प्रेमाला उपमा नाही, ते देवाघरचे देणे… असं म्हणतात. ती देणगीच आहे म्हटल्यावर मग प्रेमाला वयाचं बंधन कुठून असणार? ते कधीही, कुणावरही होऊ शकतं. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक व प्रख्यात उद्योजक बिल गेट्स हे सध्या असाच अनुभव घेत आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

जगातील अब्जाधीशांपैकी एक असलेले बिल गेट्स हे वयाच्या ६७ व्या वर्षीय पुन्हा प्रेमात पडले आहेत. ओरॅकलचे माजी सीईओ मार्क हर्ड यांची ६० वर्षीय पत्नी पॉला हर्ड हिला ते डेट करत आहेत. 

तब्बल ३० वर्षे एकत्र काढल्यानंतर आणि व्यावसायिक संघर्षात एकमेकांची साथ केल्यानंतर मेलिंडा फ्रेंच गेट्स आणि बिल गेट्स यांचा ऑगस्ट २०२१ मध्ये घटस्फोट झाला. पॉलाच्या रूपात आता बिल यांना नवी जोडीदार भेटली आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमधील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्याच्या दरम्यान बिल आणि पॉला हे एकत्र दिसले होते. स्पर्धा संपल्यानंतर बिल आणि पॉला दोघांनीही ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची सिडनीला जाऊन भेटही घेतली होती. याआधी देखील हे दोघे अनेक स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये एकत्र दिसले आहेत. त्यामुळं त्यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे सीईओ मार्क हर्ड यांच्याशी ३० वर्षांपूर्वी पॉलाचं लग्न झालं होतं. २०१९ मध्ये मार्क हर्ड यांचं कॅन्सरच्या आजारानं निधन झालं. मात्र, मार्क हर्ड याचं निधन होण्याच्या आधीच बिल गेट्स आणि पॉला एकमेकांना भेटले होते. त्यांचे अनेक कॉमन मित्र आहेत. टेनिस प्रेमामुळं या दोघांची ओळख झाली होती आणि त्यानंतर ते जवळ आल्याचं सांगितलं जातं.

People.com च्या मते, पॉलानं १९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे. त्यानंतर तिनं एका सॉफ्टवेअर कंपनीत सेल्स आणि अलायन्स मॅनेजमेंट विभागात कामाला सुरुवात केली. अनेक वर्ष तिथं ती वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होती. 

बिल गेट्स आणि पॉला हर्ड यांनी अद्याप त्यांच्या मुलांची एकमेकांशी ओळख करून दिली नसल्याचं डेली मेलचं वृत्त आहे. पॉलाला दोन मुलं आहेत.

विभाग