मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Disney Layoffs : डिस्ने करणार ७ हजार कर्मचाऱ्यांची कपात, ग्राहकांच्या संख्याही घटली

Disney Layoffs : डिस्ने करणार ७ हजार कर्मचाऱ्यांची कपात, ग्राहकांच्या संख्याही घटली

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 09, 2023 12:25 PM IST

Disney Layoffs : मंनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी डिस्नेने कर्मचारी कपातीसह स्ट्रिमिंग सेवेत गेल्या तिमाहीत ग्राहकांच्या संख्येतही मोठी घट झाल्याचे सांगितले.

disney layoffs HT
disney layoffs HT

Disney Layoffs : गुगल, मेटा, अँमेझाॅन, मायक्रोसाॅफ्ट, सॅपनंतर आता मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी डिस्नेमध्ये ७००० कर्मचाऱ्यांच्या नोकरकपातीची घोषणा केली आहे. कर्मचारी कपातीचा निर्णय सीईओ बाॅब इगर यांनी घेतला आहे. इगर यांनी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये कंपनीची सूत्रे हातात घेतली होती. डिस्नेच्या २०२१ च्या वार्षिक अहवालानुसार, समूहाने त्यावर्षी २ आॅक्टोबरपर्यंत जगभरातील १,९०.००० लोकांना नोकरीच्या संधी दिल्या. त्यातील ८० टक्के पूर्वकालिक होते.

ग्राहकांच्या संख्येत घट

सीईओ बाॅब इगर म्हणाले, मी या निर्णयाला गंभीर स्वरुपात घेतले आहे. जगभरातील आमच्या कर्मचाऱ्यांची प्रतिभा आणि काम करण्याची जिद्द याबाबत मला अभिमान आहे. डिस्नेतील कर्मचारी कपातीसोबतच त्यांनी गेल्या तिमाहीत ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचेही सांगितले. इगर यांनी सीईओ पद सांभाळल्यानंतर त्यांच्या नव्या कार्यकाळात अनेक प्रकारची आव्हाने समोर येत आहेत. डिस्ने फ्लोरिडाचे गव्हर्नर राॅन डिसांटीस यांच्यासोबत वादातही ते अडकले आहेत. तर डिस्नेला नेटफ्लिक्सकडूनही होणाऱ्या चूरशीच्या अटीतटीच्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे.

हे आहे कर्मचारी कपातीेचे कारण

या नोकरकपातीमुळे अंदाजे ५.५ अब्ज डाॅलर्सचा होणारा खर्च वाचणार आहे. आगामी काळात कंपनीची पूर्नरचना करण्याच्या उद्देशाने ही कर्मचारी कपात केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या पाच वर्षात कंपनीने आतापर्यंत ३ वेळा पूर्नरचना केली आहे.लाईव्ह स्ट्रिमिंग व्यवसायाला गती देण्यासाठी कंपनीने २०१८ मध्ये पहिल्यांचा पूर्नरचना करण्यात आली होती. त्यानंतर कोऱोना काळात अंदाजे ३२ हजार कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले. आणि आत्ता ७ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग