मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Coin vending machine : आता सुट्ट्या पैशांची टंचाई भासणार नाही! RBI ने काढला जबरदस्त तोडगा

Coin vending machine : आता सुट्ट्या पैशांची टंचाई भासणार नाही! RBI ने काढला जबरदस्त तोडगा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 09, 2023 09:21 AM IST

Coin vending machine : आता तुम्हाला यूपीआयच्या माध्यमातून एटीएममधून नाणी काढता येतील. आरबीआयने चलनविषयक धोरणाच्या बैठकीनंतर कॉईन व्हेंडिंग मशीन बसवण्याची घोषणा केली.

RBI HT
RBI HT

Coin vending machine : आता तुम्हाला यूपीआयच्या माध्यमातून एटीएममधून नाणी काढता येतील. आरबीआयने चलनविषयक धोरणाच्या बैठकीनंतर कॉईन व्हेंडिंग मशीन बसवण्याची घोषणा केली. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की क्यूआर कोडवर आधारित नाणे वेंडिंग मशीन बसवण्याची त्यांची योजना आहे. त्यासाठी ते पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहेत.

नाण्यांची उपलब्धता वाढवणे हा यामागचा उद्देश असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. ते म्हणाले की रिझर्व्ह बँक सुरुवातीच्या टप्प्यात देशातील १२ शहरांमध्ये ते सुरू करणार आहे.

अशाप्रकारे काम करेल काॅईन व्हेंडिंग मशीन

काँईन व्हेंडिंग मशिन ही एक आँटोमॅटिक मशिन्स आहेत. ती संपूर्णरित्या यूपीआयशी कनेक्ट केली जातील. क्यूआर कोड आधारित व्हेंडिंग मशीन यूपीआय​​द्वारे वापरल्या जातील. त्यात नोटांऐवजी नाणी ग्राहकांच्या गरजेनुसार उपलब्ध करतील. कोणताही ग्राहक या कॉईन व्हेंडिंग मशीनमधून त्यांच्या यूपीआय अॅपद्वारे मशीनच्या वरचा क्यूआर कोड स्कॅन करून नाणी काढू शकतो. ग्राहकाने काढलेल्या नाण्यांची रक्कम त्याच्या नोंदणीकृत बँक खात्यातून वजा केली जाईल.

अशी निर्माण झाली सुट्य्या पैशांची टंचाई

८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी सरकारने नोटबंदी जाहीर केली. जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा केंद्र सरकारने बंद केल्यानंतर सरकारने दोन हजाराची नोट चलनात आणली. अनेक एटीएममधून दोन हजारची नोट निघत होती. मात्र या नोटांचे सुट्टे पैसे कसे करायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या अडचणीमुळे जवळ पैसे असूनही नागरिकांना खर्च करता येत नव्हते. जुन्या हजार, पाचशेच्या नोट बंद झाल्यानंतर शंभरच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता. तर दुसरीकडे सरकारने डिजीटल करन्सीला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळेही बाजारात रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग