मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  AAP: केजरीवालांनी करून दाखवलं, 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार! काय आहेत निकष?

AAP: केजरीवालांनी करून दाखवलं, 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार! काय आहेत निकष?

Dec 08, 2022, 12:03 PM IST

  • AAP to become National Party: अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षानं गुजरात विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे.

Aam Aadmi Party

AAP to become National Party: अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षानं गुजरात विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे.

  • AAP to become National Party: अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षानं गुजरात विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे.

AAP in Gujarat Election देशाची राजधानी असलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत प्रचंड विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाला गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. गुजरातमध्ये सत्तांतराचा दावा करणाऱ्या 'आप'ला दोन आकडी जागा मिळालेल्या नाहीत. असं असलं तरी 'आप'नं एक वेगळा विक्रम केला आहे. गुजरातमधील मतटक्क्याच्या जोरावर 'आप'चा राष्ट्रीय पक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

viral news : मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून हकालपट्टी

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यातील आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार आम आदमी पक्षानं जवळपास १३ टक्के मतं मिळवली आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये 'आप'ला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळणार आहे. तसंच, याच मतांच्या जोरावर हा पक्ष राष्ट्रीय बनणार आहे. अर्थात, निवडणूक आयोगाकडून अंतिम मतटक्क्यांचा आढावा घेऊन याबाबत घोषणा केली जाणार आहे.

देशात किती राष्ट्रीय पक्ष?

निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार देशात सध्या काँग्रेस, भाजप, बसप, तृणमूल काँग्रेस, एनसीपी, सीपीआय, सीपीआयएम आणि एनपीपी हे राष्ट्रीय पक्ष आहेत. एनपीपीला २०१९ मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. दिल्ली, पंजाब आणि गोव्यात 'आप'नं आधीच प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवला आहे. गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ला ६.८ टक्के मतं मिळाली होती.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी कोणत्याही पक्षाला खालील अटींची पूर्तता करावी लागते

  • देशातील चार राज्यांत एखाद्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्यास त्याला आपोआपच राष्ट्रीय दर्जा मिळतो.
  • एखाद्या पक्षानं तीन राज्ये मिळून लोकसभेच्या ३ टक्के जागा जिंकल्या, तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होतो.
  • लोकसभेच्या चार जागांव्यतिरिक्त संसदीय किंवा विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये एखाद्या पक्षाला ६ टक्के मते मिळाली तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
  • एखाद्या पक्षानं वरील तीनपैकी कोणतीही एक अट पूर्ण केली तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होतो.

Himachal Election Results: हिमाचलमध्ये निकालाआधीच फोडाफोडीची भीती, काँग्रेसचे 'ओल्ड गार्ड' सावध