मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Assembly elections Results : काँग्रेसच्या हिंदी पट्ट्यातील पराभवाची ५ कारणे, BJP च्या वादळात का उडाली धूळधाण?

Assembly elections Results : काँग्रेसच्या हिंदी पट्ट्यातील पराभवाची ५ कारणे, BJP च्या वादळात का उडाली धूळधाण?

Dec 03, 2023, 03:10 PM IST

  • Why Congress Lost Assembly Election : गायी पट्ट्यात काँग्रेसचा पराभव का झाला, याच्या कारणांची चर्चा सुरू झाली असून प्रमुख पाच कारणे समोर येत आहेत.

Why Congress Lost Assembly Election

Why Congress Lost Assembly Election : गायी पट्ट्यात काँग्रेसचा पराभव का झाला, याच्या कारणांची चर्चा सुरू झाली असून प्रमुख पाच कारणे समोर येत आहेत.

  • Why Congress Lost Assembly Election : गायी पट्ट्यात काँग्रेसचा पराभव का झाला, याच्या कारणांची चर्चा सुरू झाली असून प्रमुख पाच कारणे समोर येत आहेत.

नवी दिल्ली – पाच  राज्याच्या निवडणुकीनंतर चार राज्यातील निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. ४ राज्यांपैकी ३ राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी तीन राज्यातील विजय भाजपासाठी खूप महत्वाचे आहेत. हे निकाल उत्तर भारतातील हिन्दी बेल्टचा मूट म्हटले जात आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाची अनेक कारणे असू शकतात, मात्र देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला आपल्या पराभवासाठी जबाबदार महत्वाच्या कारणांवर मंथन करावे लागणार आहे. तसे पाहायला गेले तर काँग्रेसच्या पराभवाची ५ मोठी कारणे होऊ शकतात. ती पुढीलप्रमाणे आहेत..

1- काँग्रेसचे कमजोर संघटन– 

ग्राऊंड लेव्हलवरती काँग्रेसचे संघटन खूपच कमजोर दिसते. एक काळ होता, जेव्हा काँग्रेस सेवा दल, महिला काँग्रेस, सर्वोदय, यूथ काँग्रेस सारख्या संघटना पक्षासाठी झटत होत्या. त्यांचा थेट लोकांशी संपर्क होता. त्यामुळे सरकारची धोरणे व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे सोपे होते. मात्र मागील काही वर्षापासून काँग्रेसचे संघटन सुस्त झाले आहे. राज्यात सरकार असूनही जनतेपर्यंत सरकारची धोरणे पोहोचवण्यात अपयश आले.

2- पक्ष नेतृत्वात आत्मविश्वासाची कमी –

पराभवाचे सर्वात मोठे कारण हे सुद्धा आहे की, काँग्रेसचे नेतृत्व कमजोर दिसत आहे. भारत जोड़ा यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांना एक मास लीडर (जन-नेता) च्या रुपात स्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला. भारत जोडो यात्रेत लोक जमतानाही दिसले. मात्र लोकांची गर्दी मतांमध्ये रुपांतरीत झाली नाही. काँग्रेसच्या अंतर्गत संघटनेतही नेतृत्वावर विश्वासाची कमी दिसून आली. त्याचा लाभ भाजपला झाला.

3- अनेक राज्यातील गटबाजी –

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली.  राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि सचिन पायलट गटातील संघर्ष निवडणूक काळातही दिसून आला. गेल्या पाच वर्षापासून काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व दोन्ही गटातील वाद मिटवण्याच्या प्रयत्नात होते. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेक छोट्या-मोठ्या नेत्यांनी भाजपचा आश्रय घेतला. तेव्हापासून काँग्रेसमधील खड्डा भरला गेला नाही. त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये महादेव app आणि राजस्थानमधील लाल डायरी भाजपने प्रचाराच्या केंद्रस्थानी आणली. काँग्रेसचा याचा बचाव करताना दिसली नाही.

4- संवादाचा अभाव – 

काँग्रेसची संघटना कमजोर का दिसते? कारण नेतृत्व संघटनेपर्यंत पोहोचू शकत नाही. यावेळी  प्रियंका गांधी यांनी खूप प्रकार केला अनेक आश्वासने दिली. मात्र लोकांना आश्वासने समजलीच नाहीत. कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती राहुल गांधी यांचीही होती. त्यांनी प्रचार केला मात्र लोकांशी थेट जोडले गेले नाहीत. त्याउलट नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व नेत्यांची भाषणे लोकांना समजली. निकालाचे आकडे याची साक्ष देतात.

5- नेत्यांची वादग्रस्त विधाने –

काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. प्रत्येकवेळी नेत्यांनी टीकेची मर्यादा ओलांडली. भाजपने याचा पुरेपुर फायदा उचलला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, मोदी, खोटे बोलणाऱ्यांचे सरदार आहेत. राहुल गांधींनी मोदींना पनवती म्हटले, याचा सरळ सरळ फायदा भाजपला झाला.