मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Telangana election Results : रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री, निकालाआधीच विकिपीडियाने केली घोषणा

Telangana election Results : रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री, निकालाआधीच विकिपीडियाने केली घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 03, 2023 01:59 PM IST

Telangana Assembly Election Result : तेलंगाणामध्ये काँग्रेसच्या विजयाचे श्रेय रेवंत रेड्डी यांना दिले जात आहे. त्यांनी कामारेड्डी मतदारसंघात विद्यमान मुख्यमंत्री केसीआर यांनाही पिछाडीवर टाकले आहे. पुढचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. जाणून घेऊया कोण आहेत रेवंत रेड्डी..

रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री
रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री

Who is revanth reddy : तेलंगाणा विधानसभा निवडणूक निकालातीतल कलानुसार काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे जाताना दिसत आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समिति (BRS) चे प्रमुख के.  चंद्रशेखर रावयांना मोठा धक्का मानला जात आहे. केसीआर आपला मतदारसंघ कामारेड्डीमध्ये काँग्रेस उमेदवार रेवंत रेड्डी यांच्या मागे आहेत. तेलंगाणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी कोडंगल आणि कामारेड्डी दोन्ही मतदारसंघात आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकड्यानुसार काँग्रेस ७०, बीआरएस ३५, भारतीय जनता पार्टी (भाजपा) ७ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा)१ जागेवर आघाडीवर आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेसची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू झाल्याने तेलंगाणाचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अंतिम निकाल लागल्यापूर्वीच राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. रेड्डीच्या समर्थकांनी जल्लोष करायला सुरूवात केली आहे. एक विकिपीडिया एडिटरने निवडणूक आयोगाकडून निकाल येण्याची वाटही पाहिली नाही. रेवंत रेड्डीबाबत विकिपीडिया पेजवर मोठा बदल केला आहे. यावर लिहिले आहे की, 'रेवंत रेड्डी (जन्म ८ नोव्हेंबर, १९६७) तेलंगाणाचे राजकीय नेते, जे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळणार आहेत. दरम्यान काही वेळानंतर यात सुधारणा केली गेली. मात्र पेजच्या हिस्ट्रीमध्ये गेल्यास हा कंटेंट मिळू शकतो.

तेलंगाणामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नेते आहेत. यामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी, खासदार कॅप्टन एन उत्तमकुमार रेड्डी आणि कोमाटिरेड्डी वेंकट रेड्डी तसेच मल्लू भट्टी विक्रमार्क आदि नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीनही विधानसभा निवडणूक लढवत आहेत. मात्र यामध्ये प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये सर्वात वरती आहे.

 

रेवंत रेड्डी यांच्या विकिपीडिया पेजवर करण्यात आलेला बदल
रेवंत रेड्डी यांच्या विकिपीडिया पेजवर करण्यात आलेला बदल

तेलंगाणामधील काँग्रेसच्या विजयाचे श्रेय रेवंत रेड्डी यांना मिळत आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव समोर येत आहेत. रेवंत रेड्डी तेलंगाणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. रेड्डी तेलंगाणा काँग्रेसमधील त्या तीन लोकसभा खासदारांमध्ये सामील आहेत, ज्यांनी २०१९ मध्ये विजय मिळवला होता.

राज्यात बहुमतासाठी ६० जागा –

यादक्षिण राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी ६० जागांवर विजय आवश्यक आहे. KCRच्या नेतृत्वातील बीआरएस २०१४ मध्ये तेलंगाणा राज्याच्या स्थापनेपासून सत्तेत आहे. २०१८ ची निवडणूकही बीआरएसने जिंकली होती. पक्षाला यावेळी विजयाच्या हॅट्ट्रिकची आशा आहे. काँग्रेसने सत्ताधारी पक्षाला पराभूत करण्यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबवली.भाजपनेही आपल्या प्रचार अभियानात सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता.

IPL_Entry_Point