मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हिरोकडून Splendor Plus Xtec नवीन बाईक लाँच, जाणून घ्या किंमत व अत्याधुनिक फिचर्स

हिरोकडून Splendor Plus Xtec नवीन बाईक लाँच, जाणून घ्या किंमत व अत्याधुनिक फिचर्स

May 20, 2022, 05:07 PM IST

    • SplendorPlus XTEC मध्ये नवीन व्हेरिएंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पूर्ण डिजिटल मीटर, कॉल आणि एसएमएस अलर्ट यासारखे खास फिचर्स आहेत.
Splendor Plus Xtec

SplendorPlus XTECमध्ये नवीन व्हेरिएंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी,पूर्ण डिजिटल मीटर,कॉल आणि एसएमएस अलर्ट यासारखे खास फिचर्स आहेत.

    • SplendorPlus XTEC मध्ये नवीन व्हेरिएंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पूर्ण डिजिटल मीटर, कॉल आणि एसएमएस अलर्ट यासारखे खास फिचर्स आहेत.

मुंबई - भारतीय दुचाकी बाजारातील सर्वात मोठी कंपनी Hero MotoCorp ने गुरुवारी आपली फ्लॅगशिप मोटारसायकल व भारतातील एक लिजेंड बाईक स्प्लेंडरचे नवीन व्हेरिएंट लाँच केले आहे. या बाईकमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत, जी फिचर्स १२५ सीसी व १५० सीसी इंजिन क्षमतेच्या मोटारसायकलमध्ये असतात ती पहिल्यांदाच १०० सीसी मोटारसायकल श्रेणीमध्ये देण्यात आले आहेत. या नव्या मोटारसायकलीची दिल्लीत एक्स शोरूम प्राईज ७२,९०० रुपये इतकी आहे. आधीच्या सप्लेंडर पल्सहून ही किंमत ४ हजारांनी अधिक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर; रामलल्ला दर्शन, शरयू पूजन, असा आहे संपूर्ण कार्यक्रम!

Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, तीन महिलांसह १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Monsoon Update : खुशखबर! यंदा मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, बरसणारही जोरदार ; ‘या’ दिवशी केरळात धडकणार

विटांची भिंत तोडून भरधाव कार घुसली घरात; ३ जण जखमी, कारचा चक्काचूर, पाहा Viral VIDEO

नवीन सप्लेंडर प्लस एक्स टेक खरेदी करताना ग्राहकांना पाच वर्षांची वॉरंटी मिळेल, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.


SplendorPlus XTEC मध्ये नवीन व्हेरिएंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पूर्ण डिजिटल मीटर, कॉल आणि एसएमएस अलर्ट यासारखे खास फिचर्स आहेत.

SplendorPlus XTEC मधील फिचर्स -

हिरो मोटोकॉर्पकडून सांगण्यात आले की, हिरो स्प्लेंडर ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल आहे. जवळपास तीन दशकांपासून ही ग्राहकांची पहिली पसंती आहे. याशिवाय हे यूएसबी चार्जर, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ आणि स्टॉप-स्टार्ट सिस्टम, i3S तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

बाईक घसरली तर इंजिन आपोआप बंद होते. बाईकच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, फक्त स्टाइलला नवीन लुक देण्यासाठी नवीन ग्राफिक्स आणि कलरमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही बाईक स्पार्कलिंग बीटा ब्लू, कॅनव्हास ब्लॅक, टोर्नाडो या तीन रंगात उपलब्ध आहे. गाडीच्या हेडलाईटमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. 

इंजिन क्षमता व किंमत -

नवीन Splendor+ XTEC मध्ये ९७.२cc BS-VI इंजिन आहे जे ७.९ BHP पॉवर आणि ८.०५ Nm टॉर्क निर्माण करते. नवीन स्प्लेंडर+ XTEC चांगल्या इंधन कार्यक्षमतेसाठी i3S पेटंट तंत्रज्ञानावर बनवली आहे. Hero Splendor+ XTEC ची दिल्लीत एक्स-शोरूम प्राईज ७२,९०० पासून सुरू होते. नवीन Splendor+ XTEC ५ वर्षांच्या वॉरंटीसह येते. 

विभाग