मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्री भेटत का नाही ? उद्धव ठाकरे यांनी दिले उत्तर

मुख्यमंत्री भेटत का नाही ? उद्धव ठाकरे यांनी दिले उत्तर

Jun 22, 2022, 07:32 PM IST

    • मुख्यमंत्री भेटत नाही, आमचे प्रश्न सोडवले जात नाही अशी तक्रार करत अनेक नाराज आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या न भेटण्या मागचे कारण राज्यातील जनतेशी संवाद साधतांना स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (हिंदुस्तान टाइम्स)

मुख्यमंत्री भेटत नाही, आमचे प्रश्न सोडवले जात नाही अशी तक्रार करत अनेक नाराज आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या न भेटण्या मागचे कारण राज्यातील जनतेशी संवाद साधतांना स्पष्ट केले आहे.

    • मुख्यमंत्री भेटत नाही, आमचे प्रश्न सोडवले जात नाही अशी तक्रार करत अनेक नाराज आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या न भेटण्या मागचे कारण राज्यातील जनतेशी संवाद साधतांना स्पष्ट केले आहे.

Maharashtra political crises मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) भेटत नाहीत. ते आपल्याच आमदारांना वेळ देत नाही, अशी सातत्याने शिवसेनेतील आमदार तक्रार करत होते. या तक्रारीचे नाराजीत रुपांतर होऊन मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जवळपास ३५ जण सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेल्याने राज्यात राजकीय भूकंप आला. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही हिंदूत्ववादी आहोत असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसोब वेगळा गट स्थापन केला. मात्र, या सर्वांना आज उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घालत परत येण्याचे आव्हान केले. दरम्यान, आपण का भेटू शकलो नाही याचे स्पष्टीकरणही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.(CM gave clarification Why not to meet MLA)

ट्रेंडिंग न्यूज

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर.. प्रतिहेक्टरी मिळणार ५ हजार, ‘या’ दिवशी जमा होणार पैसे

Raj Thackeray : राज ठाकरेंना धक्का! तिकडे नारायण राणेंसाठी प्रचार सभा अन् इकडं मोठा शिलेदार उद्धव ठाकरेंच्या गळाला

राज्यात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थीतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपली बाजू स्पष्ट केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. त्यामुळे माझा आवाज बदललेला आहे. कोरोना काळात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे देशातील पाच मुख्यमंत्र्यांमध्ये गणना केली गेली. मुख्यमंत्री भेटत नाही अशी तक्रार या काळात सातत्याने केली गेली. ही तक्रार खरी होती. मी मध्यंतरी अनेकांना भेटत नव्हतो. त्याच कारणही तसेच होते. माझी शस्त्रक्रिया झाली होती. ही शस्त्रक्रीया झाली तेव्हा जो त्रास मी अनुभवला ते मलाच माहिती आहे.

डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने मी भेटू शकत नव्हतो. पण, असे असले तरी मी माझे काम सुरूच ठेवले होते. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या खोलीतून मी माझी पहिली कॅबिनेट मी रुग्णायलाच्या बाजूच्या खोलीत घेतली होती. या काळात मी भेटू शकलो नाही हे खरे असले तरी मी आता प्रत्येकाशी संवाद साधायला सुरुवात केली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री भेटत नाही म्हणणा-यांना वस्तूस्तिती सांगितली आहे.