मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची निर्वाणीची भाषा; पक्षप्रमुख पद सोडण्यासही तयार

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची निर्वाणीची भाषा; पक्षप्रमुख पद सोडण्यासही तयार

Jun 22, 2022, 07:15 PM IST

    • Uddhav Thackeray on Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या बंडखोरांना आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज थेट पक्षाचं प्रमुखपद सोडण्याचीही तयारी दर्शवली.
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray on Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या बंडखोरांना आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज थेट पक्षाचं प्रमुखपद सोडण्याचीही तयारी दर्शवली.

    • Uddhav Thackeray on Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या बंडखोरांना आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज थेट पक्षाचं प्रमुखपद सोडण्याचीही तयारी दर्शवली.

Uddhav Thackeray ready to step down as Shiv Sena Chief: भाजपसोबत सत्ता स्थापनेचा हट्ट धरत शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भावनिक साद घातली. बंडखोर आमदारांच्या इच्छेनुसार मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शवतानाच उद्धव यांनी पक्षप्रमुख पद सोडण्याचीही तयारी दर्शवली. त्यांच्या या निर्वाणीच्या भाषेमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या अर्ध्याहून अधिक आमदारांना फोडून वेगळा गट स्थापन केल्यानं राज्यातील सरकारसमोर संकट उभं ठाकलं आहे. उद्धव ठाकरे यांची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे. आजच्या फेसबुक लाइव्हमध्ये उद्धव ठाकरे यांनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली.

मुख्यमंत्री पद हे माझ्याकडं अनपेक्षितपणे आलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार येत असताना शरद पवार साहेब आणि सोनिया गांधी यांनी विश्वास दाखवला. काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते असल्यानं मीच मुख्यमंत्री पद घ्यावं असा त्यांचा आग्रह होता. त्यातून हे पद माझ्याकडं आलं. पण मी खुर्चीला चिकटून बसणारा नाही. माझ्याच लोकांना मी नको असेन तर केव्हाही पद सोडायला तयार आहे. मी राजीनामा लिहून ठेवतो. मला या पदासाठी नालायक समजणाऱ्या माझ्या माणसांनी स्वत: हा राजीनामा राज्यपालांकडं घेऊन जावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सध्याची शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही, अशी एक चर्चा सध्या सुरू आहे. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. 'खरंतर शिवसेनेबद्दल असा एक संभ्रम पसरवला जात आहे. पण शिवसैनिकांना खरंच तसं वाटत असेल आणि पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी मी नालायक आहे असं वाटत असेन तर मी हे पदही सोडायला तयार आहे. अर्थात, हे सांगणारा माझा शिवसैनिक असावा. कोणीही उठसूट फडतूस आरोप करणारा किंवा ट्रोल करणारा विरोधक नसावा. मी त्यांना बांधील नाही. मी शिवसैनिकांना बांधील आहे, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे यांच्या या भाषणामुळं बंडखोर आमदारांमध्ये चलबिचल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, या भाषणामुळं शिवसैनिक आश्वस्त होतील, असंही बोललं जात आहे.

पुढील बातम्या