मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vinayak mete Death : विनायक मेटे अपघातग्रस्त गाडीत नव्हतेच, भाच्याच्या दाव्याने प्रकरणाला वेगळेच वळण

Vinayak mete Death : विनायक मेटे अपघातग्रस्त गाडीत नव्हतेच, भाच्याच्या दाव्याने प्रकरणाला वेगळेच वळण

Aug 18, 2022, 07:26 PM IST

    • विनायक मेटे (Vinayak mete) यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी अपघाग्रस्त गाडीमध्ये विनायक मेटे नव्हतेच, असा दावा केला आहे. यामुळे प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
विनायक मेटे

विनायक मेटे (Vinayak mete) यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी अपघाग्रस्त गाडीमध्ये विनायक मेटे नव्हतेच, असा दावा केला आहे. यामुळे प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

    • विनायक मेटे (Vinayak mete) यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी अपघाग्रस्त गाडीमध्ये विनायक मेटे नव्हतेच, असा दावा केला आहे. यामुळे प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak mete) यांच्या अपघाती निधनाचा तपास आता सीआयडी करत आहे. हा अपघात होता की, घातपात असे सवाल उपस्थित केले जात आहेत. मात्र याता मेटेंचा भाचा बाळासाहेब चव्हाण यांनी केलेल्या दाव्यामुळे प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ भीषण अपघात, तिघे ठार, दोघे जखमी

Ahmednagar accident : अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

Pune vishrantwadi murder : भांडणे सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटना

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पुढील ३ दिवस पावसाचे! ठाणे रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

विनायक मेटे (Vinayak mete) यांचे भाचे  बाळासाहेब चव्हाण यांनी अपघाग्रस्त गाडीमध्ये विनायक मेटे नव्हतेच, असा दावा केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असताना या प्रकरणात नवनवीत खुलासे होत आहेत. 

बाळासाहेब चव्हाण म्हणाले की, टोलनाक्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. महामार्गावरील सीटीटीव्ही फुटेजमध्ये ते गाडीत असल्याचे दिसत नव्हते. गाडीमध्ये पुढील बाजूला मेटे यांचा सुरक्षारक्षक दिसत असून ड्रायव्हर मोबाईलवर कोणाशी तरी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यामुळे हा अपघात घडला की घडवून आणला याची चौकशी झाली पाहिजे. चालक एकनाथ कदम हा सातत्याने त्याचे जबाब बदलत असून यासंदर्भात सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, असं बाळासाहेब चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

चव्हाण म्हणाले की, विनायक मेटे यांनी जागीच प्राण सोडला आहे. हे समजल्यानंतर मी चालक एकनाथ कदमला फोन केला होता. त्याने सांगितले की साहेब बरे आहेत, साहेबांना काही झाले नाही, मी २० मिनिटे साहेबांसोबत बोलतोय, ते व्यवस्थित आहेत, अशी माहिती ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी दिली. मात्र, मी विनायक मेटे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे ड्रायव्हर एकनाथ कदमने दिलेल्या त्या माहितीचा नेमका काय अर्थ घ्यायचा?” असा सवाल बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमधून उपस्थित केला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा