मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vidhan Parishad Result: शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी, मात्र ३ मते फुटली?

Vidhan Parishad Result: शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी, मात्र ३ मते फुटली?

Jun 21, 2022, 12:32 AM IST

    • शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मते पडली. मग शिवसेनेची हक्काची ३ मते कुणाला गेली? अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेची तीन मते फुटली

शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मते पडली. मग शिवसेनेची हक्काची ३ मते कुणाला गेली? अशी चर्चा सुरू झाली आहे.

    • शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मते पडली. मग शिवसेनेची हक्काची ३ मते कुणाला गेली? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई - राज्यसभा निकालानंतर विधान परिषद निकालातही भाजपची रणनिती फळाला आली असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपाला पहिल्या पसंतीची जवळपास १३३ मते पडली आहेत. त्यामुळे ही वाढलेली मते कुणाची याची कुजबूज सुरू झाली आहे. त्यात शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मते पडली. मग शिवसेनेची हक्काची ३ मते कुणाला गेली? अशी चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर, आमश्या पाडवी यांना पहिल्या पसंतीची २६ मते पडल्याने दोघंही विजयी झाले. परंतु या विजयानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. कारण शिवसेनेचे एकूण ५६ आमदार होते. त्यातील रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर शिवसेनेकडे ५५ आमदारांचं संख्याबळ होते. शिवसेनेकडे ५५ आमदारांव्यतिरिक्त काही अपक्ष, घटक पक्षांची मते होती. परंतु विधान परिषद निकालात शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मते पडली.त्यांच्या पक्षांची तीन मते तसेच अपक्ष व घटक पक्षांची मते मिळाली नाहीत, ती भाजपला मिळाल्याची चर्चा सुरू आहे.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यानंतर एकूण आठ उमेदवारांचा विजय झाला. त्यानंतर नवव्या आणि दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरस निर्माण झाली. शेवटी प्रसाद लाड यांनी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. त्याचसोबत पहिल्या फेरीत मागे असणारे काँग्रेसचे भाई जगताप यांनी विजयी पताका फडकावली.त्याचसोबत प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मते पडली आहेत.

विधानपरिषदेतील विजयी उमेदवार

रामराजे निंबाळकर- २८
एकनाथ खडसे- २९
आमश्या पाडवी- २६
सचिन अहिर- २६
प्रवीण दरेकर- २९
राम शिंदे-३०
श्रीकांत भारतीय- ३०
उमा खापरे- २७
प्रसाद लाड- २८
भाई जगताप- २६

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा