मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Election Result: भाजपचा महाविकास आघाडीला पुन्हा धोबीपछाड, पाचही जागा विजयी

MLC Election Result: भाजपचा महाविकास आघाडीला पुन्हा धोबीपछाड, पाचही जागा विजयी

Jun 20, 2022, 11:12 PM IST

  • राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला असून आपल्या पाचही जागा जिंकून आणल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला धक्का असून चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत. 

विधानपरिषद निवडणुकीत भाजपची बाजी

राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला असून आपल्या पाचही जागा जिंकून आणल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला धक्का असून चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.

  • राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला असून आपल्या पाचही जागा जिंकून आणल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला धक्का असून चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत. 

मुंबई - निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला कात्रजचा घाट दाखवला आहे. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड या निवडणुकीमध्ये विजयी झाले. तर काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची तीन मतं फुटली असून त्यांना पहिल्या पसंतीची केवळ ४१  मते मिळाली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीतील पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये भाजपचे राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर यांचा तर महाविकास आघाडीच्या रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे सचिन अहिर, आमशा पाडवी यांचा विजय झाला आहे. 

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यानंतर एकूण नऊ उमेदवारांचा विजय झाला आहे. पहिल्या फेरीमध्ये रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतासाठी २५.७३ चा कोटा ठरवण्यात आला होता. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.

विधानपरिषदेतील विजयी उमेदवार

रामराजे निंबाळकर
एकनाथ खडसे
आमशा पाडवी
सचिन अहिर
प्रवीण दरेकर
राम शिंदे
श्रीकांत भारतीय
उमा खापरे

प्रसाद लाड

भाई जगताप

काँग्रेसचे ‘भाई’ जगताप पराभूत, प्रसाद लाड विजयी

विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत २ मते बाद झाल्यानंतर २८३ मते वैध ठरवण्यात आली. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या फेरीत भाजपचे ४, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ उमेदवार निवडून आले. त्यानंतर या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मते मिळाली तर भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची २० मते मिळाली. 

या निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार जिंकल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण या निवडणुकीत भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यातच लढत झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र भाई जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसला झटका बसला आहे. 

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा