मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vedanta Foxconn: “..त्यामुळे वेदांता प्रकल्प गुजरातला” अजित पवारांची मुख्यमंत्र्यांना विनंती की..

Vedanta Foxconn: “..त्यामुळे वेदांता प्रकल्प गुजरातला” अजित पवारांची मुख्यमंत्र्यांना विनंती की..

Sep 14, 2022, 05:50 PM IST

    • राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn) निर्मितीचा कारखाना गुजरातऐवजी महाराष्ट्रामध्ये उभारण्यासंदर्भातील सर्व प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे.
अजित पवारांचीमुख्यमंत्र्यांना विनंती

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये सेमीकंडक्टर (VedantaFoxconn) निर्मितीचा कारखाना गुजरातऐवजी महाराष्ट्रामध्ये उभारण्यासंदर्भातील सर्व प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे.

    • राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn) निर्मितीचा कारखाना गुजरातऐवजी महाराष्ट्रामध्ये उभारण्यासंदर्भातील सर्व प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे.

Vedanta Foxconn project:‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून महाराष्ट्रात येणारी १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडेगेली आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य सरकारवर टिकेटी झोड उठवली आहे. यावरून राजकारणात घमासान सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवार (AjitPawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून हा प्रकल्प महाराष्ट्रात रहावा यासाठी सर्व ते प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Mumbai Accident : रस्ता ओलांडणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला ट्रकनं चिरडलं; मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील घटना

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Weather update : येत्या २४ तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राजकीय सभांतून वेळ मिळत नसल्याने पुन्हा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली असतानाच अजित पवार यांनी हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन,६३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच ३८०० कोटी रुपयांचा चाचणी प्रकल्प यांचा समावेश आहे. याबाबत ‘एमआयडीसी’शी प्राथमिक चर्चा सुरू होती. पश्चिम महाराष्ट्रात तळेगाव तर विदर्भात बुटीबोरीच्या जागेचा पर्याय देण्यात आला.

पत्रात अजित पवार काय म्हणाले?
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये सेमीकंडक्टर निर्मितीचा कारखाना गुजरातऐवजी महाराष्ट्रामध्ये उभारण्या संदर्भातील सर्व प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे. हा कारखाना महाराष्ट्रामध्ये उभारण्यासंदर्भातील सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र राजकीय दबावामुळे हा प्रकल्प गुजरातला स्थलांतरित करण्यात आल्याचं अजित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

 

सेमीकंडक्टर निर्मिती कारखान्याच्या या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने मंगळवारी जाहीर केले असून, या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सामंजस्य करार करणार आहेत. अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने लागेल ते करावे मात्र गुंतवणूक जाऊ देऊ नये. यामुळे महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान होणार आहे. यामधून मोठ्या प्रमाणात जीएसटी मिळणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात रहावा यासाठी सर्व ते प्रयत्न करावेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

वेदांता व नेवान येथील फॉक्सकॉन या कंपनीचे ६०:४० असाईटवर आले आहे. सर्वसाधारणपणे २ लाख कोटीची गुंतवणूक व अंदाजे २.५ लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प उभारणीसाठी या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा केली होती. कंपनीनेतळेगाव येथील जागा अंतिम केली होती. त्यासाठी तळेगांव येथील त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टिम, अटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व कनेक्टीव्हिटी,  JNPT शी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे धोरण हे पोषक असल्याने त्यांनी तळेगांव येथील १००० एकर जागेची निवड केली होती. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कंपनीला बऱ्याच सवलती देण्याचे मान्य केल्याचे कळते. मात्र आता गुंतवणूक गुजरात येथे गेल्याचे कळते. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा प्रस्तावित आहे.