मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Prakash Ambedkar : शिवसेनेशी युतीची घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांचं शरद पवारांबाबत मोठं विधान

Prakash Ambedkar : शिवसेनेशी युतीची घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांचं शरद पवारांबाबत मोठं विधान

Jan 23, 2023, 10:32 PM IST

  • Prakash Ambedkar on Sharad Pawar : शिवसेनेशी युती करताना प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

Sharad Pawar - Prakash Ambedkar

Prakash Ambedkar on Sharad Pawar : शिवसेनेशी युती करताना प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

  • Prakash Ambedkar on Sharad Pawar : शिवसेनेशी युती करताना प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

Vanchit Bahujan Aghadi : शिवसेनेतील बंडामुळं राज्यातील राजकीय समीकरणं बदललेली असतानाच आज शिवसेना व वंचित बहुजन आघाडीनं युतीची घोषणा केली. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला महाविकास आघाडीत स्थान मिळणार का, याबाबत सध्या तर्कवितर्क सुरू आहेत. त्यावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्वत: भाष्य केलं.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

प्रबोधनकार ठाकरे डॉटकॉम या वेबसाइटच्या लोकार्पण कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते. त्यानंतर राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती युतीची चर्चा सुरू झाली होती. पडद्यामागे दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकाही सुरू होत्या. मात्र, त्याची अधिकृत घोषणा होत नव्हती. त्याबाबत खुद्द प्रकाश आंबेडकरांनीही खुलासा केला होता. 'शिवसेनेची आमची युती जवळपास झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीत घेण्यावरून अडलं आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्हाला विरोध आहे, असं त्यांनी बोलून दाखवलं होतं. विशेषत: शरद पवार व अजित पवार यांचं नाव त्यांनी घेतलं होतं.

आज शिवसेना व वंचितची युती प्रत्यक्षात आल्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला गेला. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘शिवसेना व वंचितच्या युतीबद्दल शरद पवारांची प्रतिक्रिया मी आज वाचली. त्यात नवीन काही नाही. आमचं भांडण खूप जुनं आहे. हे काही शेताच्या बांधावरचं भांडण नाही. नेतृत्वाचं आणि वैचारिक दिशेचं भांडण आहे. शरद पवार हे देखील आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा मी बाळगतो.’