मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Marathi News 20 January 2023 Live News

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray

Shiv Sena hearing Live : शिवसेना कुणाची? ३० जानेवारीला पुढील सुनावणी, निर्णयाची दाट शक्यता

Thackeray Vs Shinde ECI Hearing : शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर अधिकार कोणाचा या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढं ३० जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

Fri, 20 Jan 202302:27 PM IST

Shiv Sena: शिवसेनेवरील अधिकाराच्या वादाची पुढील सुनावणी ३० जानेवारीला, निकालही अपेक्षित

शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे या वादावरील सुनावणी आता ३० जानेवारीला होणार आहे. आज दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापला युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणूक आयोगानं दोन्ही बाजूंना येत्या सोमवारी लेखी उत्तर देण्यास सांगितलं आहे. त्यानंतर ३० जानेवारीला पुढील सुनावणी होणार असून त्या दिवशी निकाल येण्याची दाट शक्यता आहे.

Fri, 20 Jan 202301:52 PM IST

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेते हे पद कायदेशीर - महेश जेठमलानी

एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेते हे पद कायदेशीर आहे. शिंदे यांच्या बंडामुळं पक्षात उभी फूट पडली आहे. त्यामुळं हे पद बेकायदेशीर ठरत नाही, असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केला आहे.

Fri, 20 Jan 202301:00 PM IST

Thackeray Vs Shinde : निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना ठाकरे व शिंदे गटाच्या वकिलांमध्ये वाद

केंद्रीय निवडणूक आयुक्तांसमोरच ठाकरे व शिंदे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी. प्रतिनिधी सभेच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे देवदत्त कामत व शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात वाद झाला. निवडणूक आयुक्तांनी यात मध्यस्थी केली.

Fri, 20 Jan 202312:37 PM IST

Shinde Vs Thackeray : एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेते हे पदच बेकायदा - ठाकरे गट

शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेते असं पदच नाही. त्यामुळं एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेते पद बेकायदा आहे, असा जोरदार युक्तिवाद ठाकरे गटानं केला आहे.

Fri, 20 Jan 202312:39 PM IST

Thackeray Vs Shinde : एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू

संघटनात्मक संख्याबळ आणि लोकप्रतिनिधींचं संख्याबळ यात फरक आहे. राजकीय पक्ष म्हणून आमच्या बाजूनं असलेल्या लोकप्रतिनिधींचं संख्याबळ विचारात घ्यावं. ते संख्याबळ आमच्याकडं आहे, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केला.

Fri, 20 Jan 202312:22 PM IST

Kapil Sibal : उद्धव ठाकरे यांचा गट हीच खरी शिवसेना - अॅड. कपिल सिब्बल

एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेत खोटी व दिशाभूल करणारी माहिती आहे. हा वाद म्हणजे संसदीय कार्यपद्धतीची थट्टा आहे. प्रतिनिधी सभा आमच्या बाजूनं असून ही प्रतिनिधी सभाच पक्ष चालवते. पक्ष सोडून गेलेले सदस्य सभेचा भाग होऊ शकत नाहीत. त्यामुळं ठाकरे गट हीच खरी शिवसेना आहे, असा युक्तिवाद उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे.

Fri, 20 Jan 202311:52 AM IST

Thackeray Vs Shinde : शिवसेना कुणाची?; वादावर युक्तिवाद सुरू

शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह धनुष्य बाणावर अधिकार कोणाचा या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढं सुनावणीला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वतीनं अॅड. कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत.

Fri, 20 Jan 202310:28 AM IST

Election Commission Of India : शिवसेना व धनुष्य बाणावरील सुनावणी अर्धा तास लांबणीवर

शिवसेना पक्ष व धनुष्य बाण या निवडणूक चिन्हावर हक्क कोणाचा? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा की एकनाथ शिंदे गटाचा? या वादावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढं होऊ घातलेली सुनावणी अर्धा तास लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी सायंकाळी ४ वाजता सुरू होणार होती. मात्र, आता ती साडेतीनला सुरू होणार आहे.

Fri, 20 Jan 202309:27 AM IST

Pune RTO : अडकवून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने वाहन कर न भरलेल्या व विविध मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, आळंदी रोड कार्यालय, वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी मोटार वाहन कर व दंड भरुन सोडवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Fri, 20 Jan 202304:37 AM IST

Hearing on Shiv Sena : शिवसेना, धनुष्यबाण कुणाचा यावर आज होणार सुनावणी 

शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला? या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीची दुसरी फेरी मंगळवारी झाली होती. यावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार असून आज तरी यावर निर्णय लागतो का या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Fri, 20 Jan 202312:06 AM IST

Pune ncp news : राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पुणे महानगरपालिकेसमोर निदर्शन

पुणे : पुण्यातील रस्त्याची झालेल्या दुरवस्थेतेच्या विरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पुणे महानगरपालिकेसमोर निदर्शन. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील आजी-माजी खासदार आमदार सर्व पदाधिकारी राहणार उपस्थित.

Fri, 20 Jan 202312:05 AM IST

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे आज पुणे दौऱ्यावर

पुणे :  केंद्रीय मंत्री नारायण राणे आज पुणे दौऱ्यावर असतील. सिम्बॉयसिस महाविद्यालयात जीत केलेल्या रोजगार मेळाव्याला नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.

Fri, 20 Jan 202312:04 AM IST

Nagapur : नागपुरात आज ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे उद्घाटन

नागपुरात आज ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संयुक्तरित्या या तीन दिवसीय संमेलनाचे आयोजन केले आहे.

Fri, 20 Jan 202312:00 AM IST

Brij Bhushan Sharan Singh : ब्रिजभूषण सिंग राजीनामा देणार; खेळाडूंच्या आंदोलला यश, क्रीडामंत्र्यांनी पाठवली नोटीस

Brij Bhushan Sharan Singh : लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर आता कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांना चांगलाच दणका बसला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घातले असून ब्रिजभूषण सिंग यांना या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हा निर्णय घेतला आहे.