मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अंगावर वीज पडून तरुणीचा मृत्यू, जळगावमधील घटना

अंगावर वीज पडून तरुणीचा मृत्यू, जळगावमधील घटना

Mar 20, 2023, 06:09 PM IST

  • अंगावर वीज पडून शेतमजूर तरुणीचा मृत्यू झाला. नगाव खुर्द येथे परराज्यातून कुटुंबासह आलेली निरगली ही रविवारी शेतात मजुरीसाठी गेली होती.

अंगावर वीज पडून तरुणीचा मृत्यू

अंगावर वीज पडून शेतमजूर तरुणीचा मृत्यू झाला. नगाव खुर्द येथे परराज्यातून कुटुंबासह आलेली निरगली ही रविवारी शेतात मजुरीसाठी गेली होती.

  • अंगावर वीज पडून शेतमजूर तरुणीचा मृत्यू झाला. नगाव खुर्द येथे परराज्यातून कुटुंबासह आलेली निरगली ही रविवारी शेतात मजुरीसाठी गेली होती.

अंगावर वीज पडून शेतमजूर तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील नगाव खुर्द (ता. अमळनेर) येथे घडली.

ट्रेंडिंग न्यूज

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

Nashik Accident: नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली

निरगली मुका पावरा (१७) असे या ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. नगाव खुर्द येथे परराज्यातून कुटुंबासह आलेली निरगली ही रविवारी शेतात मजुरीसाठी गेली होती. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह वादळाला सुरुवात झाली. त्यामुळे मजूर महिला गावाकडे परतत होत्या. त्याचवेळी मागे राहिलेल्या निरगलीवर वीज कोसळली. त्यात ती जागीच ठार झाली.

दरम्यान, जळगावमध्ये घरासमोर खेळताना लोंबकळत असलेल्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने शॉक बसून चिमुकलीचा मृत्यू झाला. धनवी महेंद्र बाविस्कर (वय ५, रा. निमखेडी) असे चिमुकलीचे नाव आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. निमखेडी गावातील दत्त मंदिराजवळ आपल्या घरासमोर खेळता-खेळता चिमुकली मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलीचे अचानक जाण्याने बाविस्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेंद्र बाविस्कर कुटूंबासह मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. निमखेडी गावातील दत्त मंदिराजवळ हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी महेंद्र बाविस्कर यांची मोठी मुलगी धनवी ही शेजारच्या काही मुला-मुलींसोबत घरासमोर खेळत होती. जवळच ट्रॅक्टर उभे होते. त्या ट्रॅक्टरवर ती खेळत होती. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या होत्या व अनेक ठिकाणी लटकत होत्या. अशाच एका वीज प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने धनवीचा जागीच मृत्यू झाला. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा