मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Electric Vehicle: टाटा पॉवर राज्यात महामार्गांवर १५०० चार्जिंग पॉईंट्स उभारणार

Electric Vehicle: टाटा पॉवर राज्यात महामार्गांवर १५०० चार्जिंग पॉईंट्स उभारणार

HT Marathi Desk HT Marathi

Sep 04, 2022, 05:15 PM IST

    • महाराष्ट्रातील सर्व प्रमुख महामार्गांवर दीड हजार चार्जिंग पॉइंट उभारण्याची योजना टाटा पॉवर कंपनीने आखली आहे. (Electric Vehicles Charging Stations by Tata Power)
Tata power charging stations

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख महामार्गांवर दीड हजार चार्जिंग पॉइंट उभारण्याची योजना टाटा पॉवर कंपनीने आखली आहे. (Electric Vehicles Charging Stations by Tata Power)

    • महाराष्ट्रातील सर्व प्रमुख महामार्गांवर दीड हजार चार्जिंग पॉइंट उभारण्याची योजना टाटा पॉवर कंपनीने आखली आहे. (Electric Vehicles Charging Stations by Tata Power)

पर्यावरणपूरक वाहन म्हणून सध्या इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे लोकांचा अधिक कल असल्याचं दिसतं. परंतु या वाहनांसाठी आवश्यक चार्जिंग पॉइंट सर्वत्र उपलब्ध नसल्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करताना चार्जिग कुठे करायचे याबाबतचा संभ्रम कायम आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख महामार्गांवर दीड हजार चार्जिंग पॉइंट उभारण्याची योजना टाटा पॉवर कंपनीने आखली आहे. वाहनचालकाला एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करताना चार्जिंगची चिंता नको यासाठी ५० ते ८० टक्के चार्जिंग स्टेशन्स हे महामार्गांवर असणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

सध्या टाटा पॉवरने मुंबई-पुणे महामार्ग तसेच पुणे-गोवा महामार्गावर इलेक्ट्रिक व्हेइकल्स चार्जिंग स्टेशन्स (Electric Vehicles Charging Stations) उभारली असून यासाठी पेट्रोल पंप्स, फूड कोर्ट्स इत्यादी ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. राज्यभरात ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या विस्ताराला गती देण्यासाठी टाटा पॉवरने नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO)सोबत करार केला असून त्यांच्याशी संलग्न मालमत्तांमध्ये ५००० ईव्ही चार्जिंग पॉइंट्स स्थापित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

टाटा पॉवरकडून २०२३ मध्ये संपूर्ण महाराष्ट्राभरात महामार्गांवर दोन्ही बाजूंना १२५ ते १५० किलोमीटर अंतरादरम्यान ईव्ही चार्जर्स बसवले जाणार आहे. सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये ६०० चार्जिंग पॉईंट्स उभारण्यात आले असून २०२३ च्या अखेरपर्यंत १००० चार्जिंग पॉईंट्स बसवण्याची योजना आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई, शिर्डी, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, महाबळेश्वर, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली या शहरांना जोडणाऱ्या महामार्गांवर टाटा पॉवरची चार्जिंग स्टेशन्स आहेत. सर्व जिल्ह्यांमधील चार्जर वापर आणि वाहनांची वाढती संख्या यांचे विश्लेषण करून त्यानुसार चार्जर्सच्या उभारणीचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती टाटा पॉवरचे वितरण प्रमुख निलेश काणे यांनी दिली.

ईव्ही चार्जिंगची संपूर्ण यंत्रणा टाटा पॉवर ‘ईझेड’ चार्ज या मोबाईल अॅपमार्फत सक्षम करण्यात आली आहे. हे अॅप ग्राहकांना सुविधाजनक डिजिटल अनुभव मिळवून देते. या मोबाईल फोन ऍप्लिकेशनमार्फत ईव्ही चार्जर, कार आणि ग्राहक एकमेकांशी जोडले जातात. लोकेटिंग, नेवीगेटिंग, बुकिंग, चार्जिंग, पेमेंट या मूलभूत वैशिष्ट्यांबरोबरीनेच विशेष रेट प्लॅन्स, रूट प्लॅनिंग अशी अनेक प्रगत वैशिष्ट्ये देखील ईझेड चार्ज अॅपमध्ये आहेत.

साधारणपणे चारचाकी इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीची क्षमता जवळपास ३० KWH ( Kilo Watt Hour) इतकी असते. ३० KWH बॅटरी क्षमता असलेली कार २००-२२० अंतर धावू शकते. ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा व्यवसायाचे आर्थिक मॉडेल, विजेची किंमत, चार्जर्सच्या किमती आणि संचालन व देखरेख खर्च यांचा विचार करून सध्या १५ ते १८ रुपये/केडब्ल्यूएच+जीएसटी असे दर आकारले जात आहे.

महाराष्ट्रात विजेवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या जवळपास ७००० आणि वर्षभरात सरासरी १२००० किमी प्रवास असे गृहीत धरल्यास एका वर्षभरात ६० लाख लिटर इंधनाची बचत केली जाऊ शकेल, असा अंदाज आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा