मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sushma Andhare: अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात सुषमा अंधारेंची उडी; देवेंद्र फडणवीसांना म्हणाल्या...

Sushma Andhare: अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात सुषमा अंधारेंची उडी; देवेंद्र फडणवीसांना म्हणाल्या...

Mar 18, 2023, 07:20 AM IST

  • Amruta Fadnavis Blackmailing Case: अमृता फडणवीस ब्लॅकमेलप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Maharashtra Politics

Amruta Fadnavis Blackmailing Case: अमृता फडणवीस ब्लॅकमेलप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Amruta Fadnavis Blackmailing Case: अमृता फडणवीस ब्लॅकमेलप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sushma Andhare on Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी एका संशयित महिलेस अटक करून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने अनिल जयसिंघानी यांना सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पहिले लाच ऑफर केली. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

अनिक्षा जयसिंघानी असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अमृता फडणवीसांच्या तक्रारीनंतर मलबार पोलिसांनी अनिक्षा जयसिंघानीला उल्हासनगर येथून अटक करण्यात आली. अनिक्षाला मुंबई सत्र न्यायालयात हजर केले असता २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण घटनाक्रमानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सुषमा अंधारे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, “माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्याविरोधात चौकशी चालू असताना निष्पक्ष चौकशी व्हावी, या हेतूने नैतिकता म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता जर विद्यमान गृहमंत्र्याच्या पत्नीच्या संदर्भात चौकशी चालू असेल तर अशीच नैतिकता दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायलाच हवा.”

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा