मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bengaluru: भयंकर! स्वच्छतागृहात कॅमेरा लावून बनवले तब्बल १२०० मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ

Bengaluru: भयंकर! स्वच्छतागृहात कॅमेरा लावून बनवले तब्बल १२०० मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ

Nov 24, 2022, 10:24 AM IST

  • Bangalore porn video news: बंगळुरू येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाने मुलींच्या वसतिगृहात कॅमेरा लावून तब्बल १२०० मुलींचे अर्धनग्न व्हीडिओ तयार केल्याने खळबळ उडाली आहे.

क्राइम न्यूज (HT_PRINT)

Bangalore porn video news: बंगळुरू येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाने मुलींच्या वसतिगृहात कॅमेरा लावून तब्बल १२०० मुलींचे अर्धनग्न व्हीडिओ तयार केल्याने खळबळ उडाली आहे.

  • Bangalore porn video news: बंगळुरू येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाने मुलींच्या वसतिगृहात कॅमेरा लावून तब्बल १२०० मुलींचे अर्धनग्न व्हीडिओ तयार केल्याने खळबळ उडाली आहे.

Bangalore porn video news: बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. होसाकेरेहल्ली परिसरालगत असेलेल्या एका मुलींच्या खासगी वसतीगृहाच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा लाऊन तब्बल १२०० मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ बनवल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने त्याच्या प्रेयसीचा देखील व्हिडिओ देखील बनवला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या पूर्वी देखील आरोपीने असे कृत्य केले होते. त्यावेळी त्याचा माफीनामा घेऊन सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याने हे कृत्य पुन्हा केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

Nashik Accident: नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली

शुभम आझाद असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असून त्याने गोपनीयतेचा भंग करत व्हिडीओ आणि फोटो काढले आहेत. . तो मूळचा बिहारचा आहे. त्याला स्वच्छतागृहात कॅमेरा लावताना काही मुलींनी रंगेहात पकडल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता. यानंतर आरोपीने वसतीगृहातून पळ काढला होता. मुलींनी पोलिसांत तक्रार दिल्यावर त्याचा शोध घेण्यात आला. पोलिसांना त्याच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ देखील आढळले आहेत. मुलींनी त्याला पकडल्यावर वासतिगृहतील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात आरोपी शुभम दिसत आहे.

 

यानंतर मुलींनी केलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभचा फोन जप्त करण्यात आला असून त्यातील १२०० आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो पोलिसांनी जप्त केले आहेत. शुभमकडे आणखी काही व्हिडिओ असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. शुभने या पूर्वीही असेच कृत्य केले होते. त्यावेळी देखील त्याला रंगेहात पकडण्यात आले होते. मात्र, त्याच्याकडून माफीनामा लिहून त्याला सोडून देण्यात आले होते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा